ताईंचे काम आणि कार्यकर्त्यांची मेहनतीमुळेच विजय ; नंदकिशोर महाजन

0

रावेर | प्रतिनिधी
रावेर मतदार संघातील भाजपा उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे यांचा दणदणीत विजय झाला असून सदर विजय हा एका महिन्यातील प्रचाराने झालेला नसून गेल्या पाच वर्षातील रक्षा ताई यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन मतदार संघात केलेल्या विकासकामांची पावती असून 1200 गावांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून तिथल्या समस्यांचे प्राधान्य क्रम देऊन सोडविल्या आहेत. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या सुख दुः खात त्या नेहमी सहभागी झालेल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्ते यांनी त्यांच्या विजयासाठी स्वयंस्फूर्तीने परिश्रम घेतले आणि पक्षाच्या विचारांना एकत्रित करून मतदानात रूपांतरित केले आहे. त्यांच्या कार्यकक्षेत असलेल्या रेल्वे, दूरसंचार विभाग, सुरक्षा विषयक ध्येय धोरणे, जलसिंचन, शेतकरी हित असलेल्या योजना प्रभावीपणे राबविल्या पुढील काळात देखील विकासाची गंगोत्री मतदार संघात वाहतच राहील असे जीप उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले

Leave A Reply

Your email address will not be published.