परदेशी झाडे पर्यावरणास घातक;-सतीश जैन

0

परदेशी झाळे लावने फक्त फॅशन; परदेशी झाडावर पक्षी घरटे करीत नाही

पारोळा :- पावसाळा आला की झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम सुरू असते त्याप्रमाणे कुसुंब्यातही पर्यावरण समतोलासाठी बहुसंख्य नागरिक झाडे आपआपल्या शेतात अन्यथा घरासमोर लावित आहेत. अशाच झाडे लावण्याच्या कार्यक्रमप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, परदेशी झाडे पर्यावरणास घातक असल्याची माहिती खानदेश जैन समाजाचे प्रसिद्धीप्रमुख सतीश वसंतीलाल जैन कुसुंबा यांनी दिली.

जैन पुढे म्हणाले की आज-काल बहु उपयोगी वड, पिंपळ, चिंच, फणस, आवळा, बेल, कडूनिंब, कदंब , पळस, उंबर अशी भारतीय झाडे लावायची सोडून मॉडर्न पणाच्या खोट्या समजुतीने परदेशी कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, स्पॅथोडिया अशी परदेशी झाडे लावण्याची फॅशन आली आहे पण ही परदेशी झाडे पर्यावरणास आरोग्यास घातक असल्याचे संशोधनावरून सिद्ध झाले आहे परदेशी झाडांवर कधीही पक्षी बसलत नाहीत आणि घरटेही करत नाही. पक्षी मूळ भारतीय असलेल्या बाभूळ या झाडावर घरटे करतात पण परदेशी झाडावर घरटे करत नाहीत. परदेशी झाडाची पाने, फुले, शेंगा आपल्याकडील प्राणी कधीच खात नाहीत. मुक्या प्राण्यांना जे कळते की परदेशी झाडे घातक आहे. ते आपणास कळत नाही. मूळ अमेरिकेतील ग्लिरिसिडीया या झाडाची पाने, फुले खाण्यात आली तर उंदीर देखील मरतात. त्याच्या आसपास गवत व इतर झाडे वाढू शकत नाही. या झाडाखालून चालतांना धाप लागते. या झाडापासून विषारी वायू उत्सर्जित केला जातो. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होते. इतके विषारी झाडे आपल्याकडे वृक्षारोपणातून सर्रास लावली जातात. जवळपास 70% सरकारी जंगले व नर्सरी ग्लिरिसिडीयाने भरलेली आहेत. 1970 च्या दशकात युरोपियन देशांनी जागतिक बॅंकेचे कर्ज देण्यासाठी भारतासमोर ग्लिरिसिडीया हे झाड भारतीय जंगलात लावण्याची अट घातली. तेव्हापासून आपल्याकडे ग्लिरिसिडीया हे झाड आले व पावसाचे प्रमाण हळूहळू कमी झालेले आहे. आपल्या शासकीय वनीकरण कार्यक्रमात वड, पिंपळ ही झाडे कमी प्रमाणात लावल्यामुळे वनीकरण अपयशी ठरले आहे. फायकस या झाडाच्या पाणाचा धूर घेतल्यास शरीर सुजते. परदेशी झाडांचे कोणतेही आयुर्वेदिक उपयोग नाहीत. त्यापासून अॉक्सिजन देखील मिळत नाही. शहरातील ज्या गार्डनमध्ये मोठ्या प्रमाणावर परदेशी झाडे आहेत. तेथे फिरायला जाणाऱ्या नागरिकांमध्ये हृदय रोगाचे प्रमाण वाढलेले असल्याचे सिद्ध झालेले आहे. मोठय़ा प्रमाणावर परदेशी झाडे लावून त्या झाडास नीलमोहोर, काशीद, सप्तपर्णी अशी स्थानिक दिशाभूल करणारी नावे दिलेली आहेत. कोणते झाड परदेशी समजायचे असा गोंधळ निर्माण होतो. यासाठी ज्या झाडांवर पक्षी बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत ते झाड परदेशी समजावे. वड, पिंपळ, पळस ही झाडे ज्या भागात आहेत तेथे खूप पाऊस पडतो. देशी झाडे मुबलक प्रमाणात अॉक्सिजन देतात व त्यांचे असंख्ये आयुर्वेदिक उपयोग आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने वृक्षारोपण करून पर्यावरणाला हातभार लावायचा असेल तर फक्त देशी झाडे लावा.

Leave A Reply

Your email address will not be published.