विद्यार्थ्यांनी यश संपादन करून गावाचे नाव रोषण करावे – अमर पाटील

0

जामनेर (प्रतिनिधी) : – आता दिलेला गणवेश जे विद्यार्थ्यी वर्षाअखेर पर्यत चांगला सुस्थितीत ठेवतील त्यांना माझ्या कडून पाचशे एक रूपयांचे बक्षीस दिले जाईल.दि.१५ आॅगस्ट पर्यत आपली शाळा आय.एस.ओ.प्रमाणित करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून विद्यार्थ्यांनी घरी आई वडिलांना कामात मदत करून भरपूर अभ्यास करावा व यश संपादन करून आपल्या आई वडीलांसह गावाचेही नाव रोषण करावे असे प्रतिपादन पंचायत समितीचे गटनेते तथा भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमर पाटील यांनी तालुक्यातील हिवरखेडे बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत विद्यार्थीना मोफत गणवेश वाटप कार्यक्रमात केले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्येचे माहेरघर सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमर पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी आदिनाथ वाडकर,शालेय पोषण आहार अधिक्षक व्ही.व्ही.काळे,केंद्र प्रमुख संजय पाटील,रा.आ. महाजन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गोपाल पाटील, उपसरपंच नामदेव झावरे,ग्रा.पं. सदस्य दिलीप महाजन,श्रीराम महाजन,रत्नाकर जोहरे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद शिंदे,उपाध्यक्षा कविता पाटील,निर्मला पाटील,मनिषा गायकवाड,दिपाली अंबिकर आदि मान्यवर उपस्थित होते. आदिनाथ वाडकर,संजय पाटील,व्ही.व्ही.काळे,गोपाल पाटील यांनी ही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेतील १२७ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.शाळेच्या मुख्याध्यापिका मिरा मोरे,बी. के.सुरवाडे,अरूण पाटील,मनोज साठे,पुष्पा पाटील,बाळू पाटील, भिसे मॅडम यांच्यासह ग्रा.पं.व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य,शिक्षक,विद्यार्थी,पालक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.