पत्रकार समाजाचा आरसा – मुख्याधिकारी नवाळे

0

भडगाव-
प्रसार माध्यमांनी लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. पत्रकार हे समाजाचा आरसा आहे. असे मत भडगाव चे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी व्यक्त केले. ते भडगाव पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी नगरध्यक्ष राजेंद्र पाटील, तहसिलदार सी. एम.वाघ, राष्ट्रवादीचे गटनेते प्रशांत पवार, नगरसेविका योजना पाटील, निवासी नायब तहसिलदार मुकेश हीवाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र जाधव, ग्रामिण रूग्णालय वैद्यकीय अधिकारीडॉ.पंकज जाधव, डॉ. प्रशांत पाटील, गटशिक्षणाधिकारी गणेश पाटील, पाटबंधारे विभागचे आर.डी. निकम, ग.स.सोसायटीचे अध्यक्ष विलास नेरकर, सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन, महाराष्ट्र पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुनील पाटील, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अशोक परदेशी, लाडकुबाई विद्यालयाच्या प्राचार्या वैशाली पाटील आदि उपस्थित होते.
मुख्याधिकारी विकास नवाळे पुढे म्हणाले की, भडगाव शहरात पालिकेने स्वच्छतेच्या बाबतीत मेहनत घेतलीच पण त्यात पत्रकारांचाही मोलाचा वाटा आहे. पत्रकारांनी स्वच्छता कर्मचार्याचा सत्कार करून खर्या अर्थाने जागल्याची भुमिका घेतली आहे. यामुळे प्रोत्साहन मिळुन अजुन च कामाला गती येईल असा विश्वास व्यक्त करत पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, तहसिलदार सी. एम.वाघ, सुनील पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार, विलास नेरकर यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान भडगाव शहर स्वच्छ व सुंदर करण्यात महत्वाची भुमिका बजावणार्या पालिकेच्या 75 स्वच्छता कर्मचार्याचा यावेळी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. पुरूष कर्मचार्याना टी शर्ट तर महीला कर्मचार्‍याना जॅकेट भेट म्हणून देण्यात आले. दरम्यान वृत्तपत्र विक्रेते, महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धेत विजेते विद्यार्थी, पुरस्कारप्राप्त शिक्षक, यात्रेनंतर घाण साफ करणारे गिरड येथील जवाहर हायस्कूलच्या विद्यार्थ्याचाही यावेळी गौरव करण्यात आला.प्रस्ताविकातुन पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अशोक परदेशी यांनी कार्यक्रमागची भुमिका विशद केली. सुत्रसंचालन राकेश पाटील व प्रा.रमेश धनगर यांनी केले. तर सुनील कासार यानी आभार मानले. यावेळी पत्रकार व कुटुंबीयाची भडगाव ग्रामिण रूग्णालयातील महालॅबच्या माध्यमाने रक्ताच्या विविध चाचण्याही करण्यात आल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.