पोलीसांकडून गावठी दारू हातभट्ट्यांवर हातोडा

0

पाचोरा दि. 7
तालुक्यातील पिंपळगाव (हरे.) पोलीस ठाणे अंतर्गत येणार्‍या गावांमध्ये पोलिसानी गावठी व देशी विदेशी दारू विक्री करणार्यावर कार्यवाहीची धडक मोहीम सुरू केली असून पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे, पोलीस उपअधीक्षक केशव पातोंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, सहायक फौजदार दिलीप पाटील, प्रल्हाद शिंदे, रणजित पाटील, सचिन पवार, संदीप राजपूत, शिवनारायन देशमुख, प्रमोद पाटील, विशाल पाटील या पथकाने,राजू पाटील या पथकाने वर्ष भरात 19 गावठी दारू विक्रेत्यांवर कार्यवाया करून त्यांचा 2 लाख 44 हजार 855 रु चे कचे व पक्के रसायन उध्वस्त केले तर देशी विदेशी दारू बाळगणार्‍या 64 जणांवर गुन्हे दाखल करून त्यांचेकडून 1 लाख 21 हजार 518 रु किमतीची देशी विदेशी दारू जप्त केली. या शिवाय वर्षाच्या सुरवातीस शेवाळे येथे गावठी दारूच्या हाथभट्टीवर छापे टाकून 17 हजार रु किमतीचे कचे व पक्के रसायन उध्वस्त करून एका महिलेसह 2 जणांवर कार्यवाही केली.
पिंपळगाव (हरे.) तालुका पाचोरा येथील पोलीस पथकाने अवैध व्यवसायांवर कार्यवाईचा सपाटा सुरू केला असून बेशिस्तपणे वाहने चालविणे, 3 सीट, लायसेन्स नसणे, वाहनाचे कागदपत्र जवळ न बाळगणे, नंबर प्लेट वर बेशिस्त डिझाईन करणे, सट्टा जुगार करणे, देशी विदेशी दारू, गावठी दारुच्या हाथभट्टया, वाळूची चोरी करणे व या सारख्या अनेक अवैध व्यवसायांवर सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील सह कर्मचार्‍यांनी शेवाळे येथे नामदेव शेंपडू कोळी व इंदूबाई प्रभू गायकवाड यांच्या गावठी दारू च्या हाथभट्टीवर छापा टाकून 400 लिटर कचे रासायन उध्वस्त करून 30 लिटर दारू जप्त केली. शिंदाड येथील कासम रमजान तडवी यांच्याकडून 5 लिटर तयार दारुसह 100 लिटर कचे रसायन व 100 लिटर पक्के रसायन उध्वस्त केले. लोहारा येथील राजू सोनू कोळी यांचेवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून 1426 रु किमतीच्या देशी विदेशी दारू चया बाटल्या जप्त केल्या. लोहरी येथील दिनेश रामचंद्र पाटील यांच्या गावठी दारूच्या हाथभट्टीवर धाड टाकून 105 लिटर तयार दारू सह 20 हजार 150 रु चे रसायन उध्वस्त केले. सातगाव डोंगरी येथील बशीर रमजान तडवी यांच्या हाथभट्टीवरून 6250 रु किमतीचे 200 लिटर कचे व पक्के रसायन उध्वस्त केले तर वरखेडी येथील पुरुषोत्तम शालीकरांम पाटील यांच्याकडून 3900 रु किमतीच्या देशी विदेशी कंपनीच्या 30 बाटल्या जप्त केल्या असुन या पुढेही ही मोहीम तीव्र करणार असल्याचे गजेंद्र पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.