पतंग उडवताना शॉक लागून बालकाचा मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे पतंग उडवतांना एका दहा वर्षीय बालकाला विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १२ वाजेच्या सुमारास घडली आहे.

हितेश ओंकार पाटील (वय १०, रा. गणपती नगर, कुसुंबा) हा जळगाव येथील न्यू इंग्लिश मिडीयम स्कुलचा विद्यार्थी आहे. हितेश हा सकाळी १२ वाजेच्या सुमारास पंतग उडवीत होता. त्याचा पतंग विजेच्या खांबावर अडकला. हा पतंग काढतांना त्याला विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. मकरसंक्रांतीच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.