पड रं पान्या पड रं पान्या कर पाणी पाणी..

0

 रजनीकांत पाटील

अमळनेर ता.  शरूड परिसरातील कापूस, उडीद मुंग, सोयाबीन, तूर, या प्रमुख पिकांची मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याकडून लागवड केली असून ज्वारी बाजरी  देखील पेहरणी झाली.  महिनाच्या शेवट नंतर पाऊस गायब  झाला असून नंतर  पाऊस पडला नाही.  याबाबत शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीला  झालेल्या  रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी, काडीकचरा वेचणी या कामांना गती देत लवकर आटोक्यात आणली.   कोरोना आजारामुळे गावातील ग्रामस्थ बाहेर जाऊन परत आल्यामुळे शेतीकामासाठी मजुरांची सध्या तरी कमतरता जाणवत नाही. तसेच सध्याची  स्थिती पाहता पावसाची वाट पाहत तहानलेली  पिके आता  कोलमडायला लागली आहेत.

पाऊस कधी  येणार या चिंतेत बळीराजा आहे  सकाळपासून रोजचे  आभाळ भरून येते.  मात्र तीच संध्याकाळ होऊन जाते.  आज ना  उद्या पाऊस येईल या आशेने  शेतकरी  दिवस काढत असतो.  वेळोवेळी डोक्यात एकच विचार करतो की,  आपले एवढे महाग मोलाचे मातीत  पेहरलेले बी- बियाण्याचे  काय होईल.  ते मातीमोल होणार तर नाही या भीतीने तो भयभीत झाला आहे.  दिवसा भरून येणाऱ्या या आभाळातून   कधी  पावसाच्या सरी येतील  या आशेने  बळीराजा चिंतेत  आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.