जि.प.सदस्या मिना पाटील यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार !

0

जळगाव- गेल्या महिन्यात ३जानेवारी रोजी जिल्हा परीषदेच्या  आरक्षणानुसार उर्वरित अडीच वर्षाच्या अध्यक्षपदासाठी निवड घेण्यात आली होती.यात राष्ट्रवादी कॉंग्रेस सदस्यांना व्हिप बजावण्यात आला होता.तरी जि.प.सदस्या मिना रमेश  पाटील यांनी अध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतदान केल्याने त्यांना अपात्र करण्यात यावे अशी तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे जिल्हा परीषद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते शशिकांत साळूंखे यांच्यातर्फे दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांकडे झालेल्या सुनावणी दरम्यान पक्षादेशाचा अवमानप्रकरणी मिना रमेश पाटील यांच्या जि.प.सदस्यत्वावर अपात्रतेची टांगती तलवार कायम असल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा परीषदेत सन २०१७मधे निवडणूकीत भाजपाचे ३५ व कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेससह इतर ३२ असे ६७ संख्याबल होते. त्यात जिल्हा परीषदेवर भाजपाची सत्ता असून पहिल्या अडीच वर्षाच्या कालावधी संपुष्टात आला होता. यापूर्वी जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादरीकरण न केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे २ सदस्य अगोदरच सन२०१९मधे जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी दिलेल्या निर्णयानुसार अपात्र आहेत. यानंतर नवीन अध्यक्षपदाच्या निवडणूकीत भाजपाला मतदान करू नये म्हणून राष्ट्रवादी  पक्षाकडून जिल्हा परीषद सदस्यांना व्हिप बजावण्यात आला होता. हा व्हिप झुगारत पातोंडा-दहिवद गटातील जि.प.सदस्या मिना रमेश पाटील यांनी अध्यक्षांना मतदान केले होते. यामुळे पक्षादेश अवमान केल्याप्रकरणी त्यांना अपात्र करण्यात यावे अशी तक्रार जिल्हा परीषद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते शशिकांत साळूंखे यांनी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांचेकडे केली होती. त्याची आज दि.१७ रोजी सुनावणी घेण्यात आली होती. याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला असून दि.२७मार्च रोजी घेण्यात येणार असल्याने मिना रमेश पाटील यांच्या जि.प.सदस्यत्वावर अपात्रतेची टांगती तलवार असल्याची चर्चा आज जिल्हा परीषदेतील सदस्यांमधे होत होती.

Leave A Reply

Your email address will not be published.