‘नूतन’मध्ये टीसी, संगणक खरेदी घोटाळ्याप्रकरणी शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार

0

जळगाव : नूतन मराठा महाविद्यालयातील टीसी घोटाळा व  बेकायदेशिर संगणक खरेदी प्रकरणी प्राचार्य डॉ.एल.पी. देशमुख यांना  विद्यापीठाचे कुलगुरू पाठीशी घालत असल्याचा आरोप पियुष नरेंद्र पाटील यांनी केला असून त्यांनी राज्यपाल आणि शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार केल्याची माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

नूतन मराठा महाविद्यालयमध्ये दि.१४ फरवरीला ब्लॉक १९ मध्ये छताचे कौल कोसळल्याने पाच विद्यार्थिनी जखमी झाल्या होत्या, यात एक गर्भवती असून त्याचा डोक्याला ५ टाके पडले. तसेच त्याच्या मोबाइलवर छताचे कौल पडल्याने मोबाइल ही फुटला गेला.त्यावेळी त्यांना अर्धातास रुग्णालयात घेऊन जाणे टाळले त्यामुळे प्रा. एल.पी.देशमुख यांच्यावर नेग्लीयन ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल व्हावा अशी ही तक्रार  कुलगुरू यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच    एम.कॉम प्रथम वर्ष या वर्गाचे इंटर्नल परिक्षाचे प्रश्न पत्रिका व्हाट्सअप ग्रुप वर विध्यार्थ्यांना दिला गेला ते पद्दत चुकीचीच आहे. तसेच एकाच बॅचवर दोन विध्यार्थ्यांना सोबत बसवणे, मोबाइलवर प्रश्नपत्रिका सोडवलं जात या प्रकरणी दोषींवर चौकशी करून तत्काळ गुन्हे दाखल करावे.

तसेच तत्काळ महाविद्यालयाच्या प्राचार्य तसेच विद्यापीठाच्या एम सी मेंबर पदावरून त्यांची हकालपट्टी करावी तसेच यामध्ये सहभागी असलेल्या प्राध्यापक – कर्मचारी यांच्यावर देखील तात्काळ गुन्हे दाखल करावे, विद्यापीठाच्या कायद्याला अक्षरशः धाब्यावर बसवले जात आहे सदर प्रकारामागे मोठी आर्थिक डीलिंग देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी याची सखोल चौकशी आपण आपल्या स्तरावरून करावी तसेच दोषी असलेल्या व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करावे अशी मागणी पियुष पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.