पंतप्रधान मोदींना गोळ्या घाला; काँग्रेस नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

0

नवी दिल्ली :- कर्नाटकचे काँग्रेस नेते वेलूर गोपालकृष्ण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबचा वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वेलूर गोपालकृष्ण यांचा ‘हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींना गोळ्या घाला’, अशा वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटक भाजपने गोपालकृष्ण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ भाजपकडून पक्षाच्या अधिकृत ट्विटवर देण्यात आला आहे.

गांधी जयंतीच्या दिवशी हिंदू महासभेच्या नेत्या पुजा शकून पांडे यांनी केलेल्या गोळीबाराच्या कृत्यावर बोलताना वेलूर गोपालकृष्ण यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. ‘सध्या लोक महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचा उदोउदो करत आहेत. हे समाजामध्ये राहण्याच्या लायकीचे नाहीत. जर त्यांना लोकशाही संपवून टाकायची असेल तर त्यांच्यामध्ये पंतप्रधान मोदींना मारण्याचीही हिंमत असायला हवी’, असे वेलूर गोपालकृष्ण म्हणाले. दरम्यान, आम्ही पंतप्रधान कार्यालय आणि पोलिस आयुक्तांना यावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी करणार आहोत, असे भाजपच्या स्थानिक नेत्याने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.