पंढरपुरातील विठ्ठलाचे मुखदर्शनही कार्तिकी यात्रेत बंद राहणार

0

पंढरपूर : कार्तिकी एकादशी सोहळा दरम्यान पंढरीत गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी २५ ते २७ नोव्हेंबर या तीन दिवशी विठ्ठलाच्या मुखदर्शनासाठी आवश्यक असणारे ऑनलाईन पास देखील बंद ठेवण्याचा निर्णय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती घेतला असल्याची माहिती सहाय्यक अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. मात्र, देवाचे नित्योपचार परंपरेनुसार केले जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

शासन आदेशानुसार १६ नोव्हेंबरपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मंदिर खुले करण्यात आले आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये. यासाठी दर्शन पासची ऑनलाईन बुकिंग आवश्यक करण्यात आले आहे. त्याचबरोबर दिवसभरात मोजक्याच भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.