न.ह.रांका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा ई – लर्निंग अभ्यास

0

बोदवड – कोरोनाच्या विषाणूच्या साथीने जनमाणसात सध्या भीतीचे वातावरण आहे.२४ मार्च पासून संपूर्ण भारतात लॉक डाऊन करण्यात आले आहे.परीक्षेच्या काळात विद्यार्थी खूप अभ्यास करतात पण लॉक डाऊन झाल्यामुळे परीक्षाच रद्द झाल्याने विद्यार्थी अभ्यासाची तयारी करताना दिसत नाहीत.त्यामुळे पालक चिंतातुर झाले होते.

इतकेदिवस मुले फक्त घरातच विना अभ्यास राहिले तर ते टि.व्ही व मोबाईलच्या मागे लागतील व वेळेचा सदुपयोग करणार नाही.याचा विचार करून मुलांनी घरीच अभ्यास करावा व तोही त्यांच्या आवडत्या साधनाद्वारे केला जावा असा विचार संस्थेचे चेअरमन मिठूलालजी अग्रवाल यांनी शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक,उपप्राचार्य,पर्यवे,क्षक यांचे जवळ व्यक्त केला. त्यासाठी निवडक शालेय विषय प्रमुखांची सहविचार सभा घेतली.तसेच व्हाटस अॅप च्या माध्यमातून सूचना पाठवल्या.या काळात ई-लर्निंगच्या अभ्यासाचे नियोजन करण्यात आले.

इयत्ता पाचवी ते नववीच्या तसेच अकरावीच्या सर्व वर्गांच्या वर्ग शिक्षकांनी व विशेष शिक्षकांनी काही चाचण्या तसेच मार्गदर्शनपर माहिती व्हिडिओज विद्यार्थ्यांना त्यांचे वर्ग करून पाठवली जात आहे.तसेचं व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून विद्यार्थांना ही माहिती पुरवण्यात येत आहे.यामुळे शाळेतील विद्यार्थी नियमितपणे चाचणी सोडून अध्ययन करत करीत आहेत.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सुट्टीतही ज्ञान मिळू लागले असून काही ऑनलाइन टेस्ट सोडल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा गुण पण दिसल्यामुळे ते आनंदी होऊन अभ्यासाला लागले आहेत.पाल्य घरातचं बसून अभ्यास करीत असल्याने पालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.तर शाळा सुरू होईपर्यंत हे अध्ययन,अध्यापनाचे कार्य सुरू राहील असे शाळेचे मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक यांनी याबाबत बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.