न्हावी ग्रामीण रुग्णालयातील आयसीटीसी सेंटरचा जिल्हस्तरिय गौरव

0

फैजपूर (प्रतिनिधी) : न्हावी ता.यावल येथील ग्रामीण रुग्णालयातील आय सी टी सी सेंटर येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एड्स नियंत्रण व प्रतिबंधासाठी विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद यांच्या शुभहस्ते आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांच्या उपस्थितित  येथील कर्मचारी व अधिकारी यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

जिल्हा एड्स नियंत्रण आणि प्रतिबंध कार्यक्रम अधिकारी मा संजय पहुरकर यांच्या अथक परिश्रमातुन आणि अभिनव संकल्पनेतून एड्स जनजागृति आणि प्रतिबंधक कार्यक्रमाला गती मिळाली असून हा पुरस्कार खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचा असल्याचे मत पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.

हा सन्मान प्राप्त करून आय सी टी सी सेंटर न्हावी यांनी परिसरातील आरोग्य सेवेला उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरव प्राप्त करून दिला आहे. ग्रामीण रुग्णालय, न्हावी येथील आय सी टी सी सेंटर अत्यंत कृतिशील असून परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून एड्स जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाय यावर विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन सातत्यपूर्ण करीत असते.  सद्यस्थितीत कोरोनाविषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर सुद्धा ऑनलाइन कार्यक्रमांच्या माध्यमातून हे कार्य अखंडित सुरू ठेवले. इतकेच नाही तर गुजरात राज्यातील व

मुंबई, पुणे व इतर जिल्ह्यातील लॉक डाऊन मध्ये अडकलेल्या पेशटना जळगाव ला जाने शक्य नसतांना त्याना घरपोच औषधी पुरविन्यात आय सी टी सी सेंटर अधिकारी आणि कर्माचारी यांनी काशोशीने प्रयत्न केले व याचीच दखल घेऊन जिल्हा स्तरावरील सन्मानात पात्र झाले. या सन्मानाचे श्रेय न्हावी येथीलडॉ. अभिजित सरोदे वैद्यकीय अधिकारी, डॉ.कौस्तुभ तळेले वैद्यकीय अधिकारी, आत्माराम सूर्यवंशी कार्यालय अधीक्षक, दिलीप तारू कनिष्ठ लिपिक, विक्रम चव्हाण कनिष्ठ लिपिक, प्रवीण पाटील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, लीलाधर चौधरी क्ष किरण अधिकारी, डी. ओ. फेगडे औषध निर्माण अधिकारी, रिता धांडे अधिपरीचारिका, निलीमा धांडे अधिपरीचारिका, मोहिनी भारंबे अधिपरीचारिका, कोमल आदिवाले अधिपरीचारिका, प्रिती भारंबे, लता कोल्हे अधिपरीचारिका, सदाशिव चौधरी कक्षसेवक, अंकुश महाजन, किशोर आदिवाले, हेमंत धनवाल, संदीप महाले, विशाल कोळी, रितेश ठाकरे, नयन दांडगे, मनोज चव्हाण समुपदेशक, पौर्णिमा चौधरी  प्रयोगशाळा तंत्रज्ञ,  धनराज धनगर, अरुण पाटील, यांना प्राप्त झाले असून या पुरस्कारामुळे परिसरातून संबंधितांवर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.