नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन तातडीची आढावा बैठक संपन्न

0

एरंडोल (प्रतिनिधी) :- दि 9 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता एरंडोल आणि धरणगाव तालुक्याची नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आढावा तातडीची बैठक तहसील कार्यालय एरंडोल येथे प्रांत अधिकारी श्री.विनय गोसावी यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी प्रांत यांनी ग्रामीण भागात विद्युत पुरवठया बाबत काळजी घेणे,रस्त्यावर झाडे पडल्यास तात्काळ अडथळा दूर करणे,नुकसान पंचनामे तात्काळ सुरू करावे,नांदेड ता.धरणगाव ग्रामस्थांच्या समस्या सोडविणे,ग्रामीण भागात तलाठी, ग्रामसेवक ,कृषी सेवक, महावितरण ,पशुवैद्यकीय ,आरोग्य विभाग, डॉक्टर यांनी मुख्यालयी रहाणे, आवश्यक वेळी उंचावर लोक स्थलांतर करणे,जुन्या पडक्या घरातील लोक तलाठी आणि ग्रामसेवक यांनी हलविणे,शुद्ध पिण्याच्या पाणी बाबत काळजी घेणे,साथीचे रोग काळजी घेणे, गावकरी यांना आवश्यक सूचना बाबत दवंडी देने,सर्व विभाग यांनी 1 कर्मचारी पावसाळा संपेपर्यंत आपत्ती कक्ष म्हणून रात्री कार्यालयात ठेवणे अश्या सूचना दिल्या.

यावेळी तहसीलदार अर्चना खेतमाळीस ,गटविकास अधिकारी धरणगाव श्रीमती स्नेहल कुडचे,गटविकास अधिकारी एरंडोल श्रीमती गायकवाड,

पो.नि .एरंडोल अरुण हजारे,पो.नि. धरणगाव श्री देसले,पो.उपनि. कासोदा श्री जाधव, नायब तहसिलदार धरणगाव श्री वाडिले,उपकार्यकरी अभियंता mseb श्री वाणी,श्री इंगळे;श्री माळी तालुका कृषी अधिकारी धरणगाव,तसेच ग्रामीण रुग्णालय पशुसंवर्धन,Bsnl आणि आरोग्य विभाग,गिरणा प्रकल्प,सा.बा. विभाग,नगरपालिका या विभागाचे प्रतिनिधी हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.