एरंडोल तालुक्यात झिमझिम पावसामुळे तीन घरे पूर्णतः पळली

0

28 घरांचे अंशतःहा नुकसान

एरंडोल (प्रतिनिधी) :- एरंडोल तालुक्यात सारख्या वाहणाऱ्या बीज पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर संततधार पावसामुळे तीन घरे पूर्णपणे पडली व 28 घरांच्या अंशतःहा भिंती पडल्या सुदैवाने प्राणहानी झाली नाही. मात्र घरे पडल्याने व पावसाच्या पाण्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काल दिवसभर व रात्री 44.75% पाऊस पडला मंडळ निहाय पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे. एरंडोल 59 मिलिमीटर रिंगणगाव 56 मिलिमीटर कासोदा 54 मिलिमीटर उत्राण 10 मिलिमीटर याप्रमाणे तालुक्यात काल एकूण 179 मिलिमीटर पाऊस झाल्याची करण्यात आली आहे. दरम्यान खरीप पिकांचे जे नुकसान झाले. त्या नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. गेल्यावर्षी कोरडा दुष्काळ होता यावर्षी ओल्या दुष्काळा सारखे चित्र निर्माण झाले आहे. असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

अंजनी धरणात 12 तासात 7 द.ल.ग.फु एवढी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पावसाच्या पुढे पावसाच्या रिपरिप मुळे पाणीसाठ्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. अंजनी धरणात एकूण 43 द.ल.ग.फु एवढा मृतसाठा झाला आहे. मृत्य साठ्याची टक्केवारी ते 33 टक्के आहे.

बालगाव तलाव खडकेसिम तलाव पद्मालय तलाव चोरट्टकी तलाव या प्रमुख तलावांमध्ये पाण्याची आवक वाढली असून असाच पाऊस सुरू राहिला तर पाणीसाठ्यात अधिक वाढ होऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.