नृत्य शिकण्यासाठी वयाचे बंधन नाही – नेहा जोशी

0

कला संस्कृतीचा प्रचार,प्रसार झाला पाहिजे, मुद्रा स्कुल ऑफ भरतनाटयम तर्फे आज सादरीकरण

जळगांव. दि.27-
भारतात अतिप्राचीन काळापासून कला नृत्य साहित्य असे अनेक विविध प्रकार असून भरतनाटयम,मणीपूरी, कुचीपुडी वा नृत्य प्रकारांसह अन्य कला संस्कृतीचा प्रचार प्रचार्र होणे गरजेचे आहे. नृत्य शिकण्यासाठी वयाचे बंधन नाही,असे मनोगत मुद्रा स्कुल ऑफ भरतनाट्यमच्या संचालिका नेहा जोाशी यांनी सांगीतले.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या कि,भरतनाटयमचे गुरू भरत पंडया व त्यांची पत्नी निनम पंडया गेले 30 वर्षापासून कायर्र्रत आहे. गुरूंच्या आर्शीर्वाद , मार्गदर्शन माध्यमातुन मी स्वतः 20 ते 22 वर्षापासून धडे गिरवीत आहे. नियमित सराव, रिहर्सल करणे गरजेचे आहे. भरतनाटयम या नृत्य प्रकारास सूमारे 200 वर्षांपासूनचा परंपरेचा इतिहास आहे. हि कला पिढीदर पिढी हस्तांतरीत होणे व गुंरूंच्या माध्यम मार्गदर्शनातुन करणे उचित होते. सन 2013 मधे जळगांव शहरात त्यांच्या प्रेरणेने मुद्रा स्कुल ऑफ भरतनाटयमची स्थापना केली.
मुद्रा स्कूल ऑफ भरतनाटयमतर्फे 29 रोजी सायंकाळी 6.30 वाजता राजे छत्रपती संभाजी नाटयगृहात आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवकृत भरतनाट्यमचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन मुद्रा स्कूल ऑफ कल्चरल व भरतनाटयमचे गुरू्र बडोदा भरत पंडया यांचे हस्ते करण्यात येणार आहे, यावेळी जैन उद्योग समूह अध्यक्ष अशोक जैन, केशवस्मृंतीचे भरत आमळकर यांचे सह अनेक मान्या वर उपस्थित रहाणार आहेत. भरत नाटयमचे गुरू यांच्या माध्यमातुन दरवर्षी या नृत्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मुद्रा स्कुल ऑफ भरतनाट्यमतर्फे शास्त्रोक्त पद्धतीने नृत्य कलेचे प्रशिक्षण दिले जाते. 8 वर्षावरील कोणत्याही मुलांना यात प्रवेश घेता येतो. या नृत्य प्रशिक्षणाचा कालावधी 7 वर्ष असतो. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना पदवी, प्रमाणपत्र दिले जाते. नृत्य शिकत असतांना पहिले दोन वर्षे केवळ बेसिक शिक्षण दिले जाते. तर त्यानंतर 3 वर्षे कोणत्याही कार्यक्रमात सहभाग नोंदवू शकत नाहीत .त्यानंतर खरा विद्यार्थी घडविण्यास किमान 5 ते 7 वर्षे कालावधी लागतो. योग्य वैद्यकिय प्रमाणपत्र सादर केल्यास वयस्क व्यक्तीसुद्धा यात प्रशिक्षणासाठी सहभाग घेवू शकतात.
शारिरीक, मानसिक फायदे
भरतनाटयम पासून शारिरीक, मानसिक स्वास्थ उत्तम रहाते, कायीक, मानसिक प्रेरणादायी असून अभ्यासात मनाची एकाग्रता, तरतरीतपणा वाढीस लागतो. शारीरीक माानसिक संतुलन, राखल जाते. व्यक्तिगत व्यक्तिमत्व विकास, चालणे,बोलणे,बसणे, पेहराव, राहणीमान, यात प्रभावशाली असून यापासून तणाव,स्पाईन आदी आजार याचे दुष्परीणाम होण्याचे टळते.
भरतनाट्यम, कलानृत्य प्रकारात स्त्रीयांची रूची मोठया प्रमाणात आहे. त्यामानाने पुरूषांचे प्रमाण कमी आहे.क्लासिकल डान्सचे कार्यक्रम नगण्य स्वरूपात आहे. प्रतिथयश पुदच्या पिढीसाठी आदर्श म्हणून या कार्यक्रमाची प्रेरणा ठरली आहे. महाबळ परीसरातील राजे छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आलेला कार्यक्रम यासायंकाळी सहा तीस वाजता आयेाजीत केला असून हा कार्यकम सर्वासाठी खुला आहे. यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही हा कार्यक्रमाचा लाभ बहुसंख्येने घ्यावा असे आवाहन नेहा जोशी, विनित जोशी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.