ट्रॅक्टरखाली दबून तरूणाचा जागीच मृत्यू

0

जामनेर,दि. 28-
तालुक्यातील ओझर येथे मानसिंग उर्फ पिंटू देवसिंग मोरे वय 30 यांचा ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे ट्रॅक्टरखाली दबून जागीच मृत्यू झाल्याची घटना काल दि.28 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे की मयत मानसिंग हा अरविंद विजयसिंग पाटील रा.ओझर खुर्द यांच्या कडे ट्रॅक्टर चालक म्हणून काम करीत होता.तो सोमवार रोजी दुपारी ट्रॅक्टर नंबर एम.एच.19 सी.503 शेतामध्ये कपाशी आणण्यासाठी नेत असताना अचानक ट्रॅक्टर पलटी झाले.त्या आवाजाने आजूबाजूचे शेतकरी तिथे जमा झाले.जे.सी.बी.च्या साहाय्याने ट्रॅक्टरखालून मानसिंगला काढून शवविच्छेदनासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.मानसिंग हा पाचोरा तालुक्यातील भागपूर येथील मूळ रहिवाशी असून तो ओझर येथे आपल्या सासरवाडीला वास्तव्यास होता.घटनेची माहिती मिळताच साहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश काळे आपल्या सहका-यांसह तात्काळ घटनास्थळी पोहोचले.ट्रॅक्टर मालक अरविंद विजयसिंग पाटील यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.