नुकसानग्रस्त भागाचा आ. चंद्रकांत पाटलांकडून अधिकाऱ्यांच्या पथकासह पाहणी दौरा

0

मुक्ताईनगर प्रतिनिधी : पूर्ण व तापी नदी किनारीलगतच्या उचंदे गणातील पुरणाड, उचंदे , शेमळदे, पंचाणे, मुंढोदे , मुंढोळदे, नायगाव, पिंप्रीनांदू , बेलसवाडी, कर्की, पिंप्री पंचम  भागात दि.27 मे रोजी दु 3.30 वाजेच्या सुमारास अचानक उद्धवलेल्या चक्रीवादळाचा मोठा परिणाम जाणवला असून हजारो हेक्टर वरील केळी बागा उद्वस्थ झाल्या तसेच अनेक घरांची, गुरांच्या गोठ्याची पडझड झाली.

विजेचे पोल, व तारा तुटल्याने परिसर भग्न व अंधकारमय झाला. या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची आज दि 28 मे 2021 रोजी सकाळी 8 वाजेपासून आमदार चंद्रकांत पाटील , तहसिलदार श्वेता संचेती, गटविकास अधिकारी संतोष नागतिळक, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, महावितरणचे कार्यकारी अभियंता महेश पाटील यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी , ग्रामसेवक व कृषी सहायक अशा शासकीय फौजफाट्यासह पाहणी केली. यावेळी सरसकट पंचनामे करून तात्काळ अहवाल शासनाकडे सादर करणायच्या सूचना आमदार पाटील यांनी संबंधितांना दिल्या.

तसेच मुंढोळदे या गावातील सुमारे 180 च्या वर घरांची पत्रे वादळात उडून गेली आणि मुसळधार पावसात भिजून सर्व डाळ , दाणा व अन्नाची नासाडी झाल्याने काल रात्री पासून उपाशी पोटी असलेल्या गावकऱ्यांसाठी स्वखर्चातून सकाळ , संध्याकाळ जेवणाची व्यवस्था केली. सदरील जबाबदारी शिवसेना शहर संघटक वसंत भलभले हे पार पाडीत आहेत. तसेच गावातील उद्वस्थ घरे तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा उभी करण्यासाठी आमदारांनी पदरमोड करून 15 मजुरांची टीम सहकार्यासाठी तात्काळ उपलब्ध केली.

यावेळी आमदारांसह काँग्रेस जिल्हा सरचिटणीस डॉ जगदीश पाटील , शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, दिलीप पाटील, राजेंद्र तळेले, स्वीय सहायक प्रशांत पाटील व इतर पदाधिकारी शेतकरी तसेच गावकरी उपस्थित होते.

वादळी वारा व पावसामुळे खूप नुकसान झाले त्याची प्रत्यक्ष पाहणी केली व अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या व शासनाकडून तात्काळ मदत मिळावी म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री ना गुलाबराव पाटील व  मुख्य सचिव  यांचेशी भ्रमणध्वनी वरून चर्चा केली.

Leave A Reply

Your email address will not be published.