निर्भयाच्या अपराध्यांवर रोज तब्बल 50 हजाराचा खर्च

0

नवी दिल्ली : निर्भयावर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्यांना फाशी ठोठावण्यास होणऱ्या विलंबामुळे प्रशासनाला वाढीव खर्चाला सामोरे जावे लागत आहे. या चार आरोपींवर दररोज 50 हजार रूपये खर्च करावे लागत आहेत. विनय शर्मा (26), मुकेश कुमार(32), अक्षय ठाकूर सिंग(31), पवन गुप्ता (25) यांना निर्भयावर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केली. त्यांना एक फेब्रुवारीला फाशी ठोठवावी, असे नवे डेथ वॉरंट नुकतेच जारी केले आहे.

डेथ वॉरंट जारी केल्यानंतर या आरोपींची सुरक्षा आणि फाशीची तयारी यासाठी होणारा खर्च वाढला आहे. या आरोपींना कारागृहातील बराक क्रमांक तीनमध्ये स्वतंत्रपणे ठेवण्यात आले आहे. येथे दोन सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येतात. त्यांना दोन तासांनी विश्रांती दिली जाते. तेथे नवीन रक्षक नेमले जातात.

अक्षय कुमार सिंग, पवन गुप्ता यांनी कारागृहात कष्टाचे काम स्वीकारले होते. त्यांनी एकूण एक लाख 37 हजार रूपये कमावले. अक्षयने 69 हजार रूपये कमावले आहेत. तर विनयला 39 हजार तर पवनला 29 हजार रूपये मिळाले आहेत. मुकेश कोणतेही काम करण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याने काहीही कमावले नाही. मुकेश, पवन आणि अक्षय यांनी दहावीला प्रवेश घेतला होता. मात्र, ते तो अभ्यसाक्रम पूर्ण करू शकले नाहीत. विनितने पदवीसाठी नावनोंदणी केली. मात्र, त्याचीही अवस्था तशीच झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.