निमजाई फाऊंडेशनतर्फे राज्य कौशल्य विकास योजना

0

जळगाव – निमजाई फाउंडेशन गेल्या 4 ते 5 वर्षांपासून शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात काम करत आहे.

या फाउंडेशन अंतर्गत महाराष्ट्र राज्य कोशल्य विकास योजने मध्ये फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर, गारमेंट, ऍनिमेशन यांसारख्या महागड्या अभ्यासक्रमाचें मोफत प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत 500 पेक्षाही जास्त विध्यार्थी प्रशिक्षण घेऊन विविध ठिकाणी रोजगार  व स्वयंरोजगार करून स्वतःची जीविका चालवतात. यासोबतच याफाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम ही राबवित असतात. अशी माहिती निमजाई फाउंडेशनच्या अध्यक्षा शितल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी सचिव भूषण बाक्षे, समन्वयक दिपक जावळे ही उपस्थित होेते.

निमजाई फाउंडेशनचे  बेटी बचाव बेटी पढाओ या उपक्रमांबाबतही फाऊंडेशतर्फे जनजागृती करण्यात येत असते. मकरसंक्रांतीनिमित्ताने आशादीप वसतीगृहात जावून तेथील महिलासोबत हळदीकुंकू कार्यक्रम साजरा करण्यात आहे.

तसेच त्यांना साड्या वाटप ही करण्यात येणार आहे. तिथे लिंबू चमचा, संगीत खुर्ची या स्पर्धा घेणार असल्याचेही शितल पाटील यांनी सांगितले. शासनाच्या कौशल्य विकास अंतर्गत विविध प्रकारचे कौशल्याचे प्रशिक्षण द्यावे, तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यावर संबंधित महिला तसेच तरुणी रोजगारसक्षम बनाव्यात या उद्देशातून 2015 साली निमजाई फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. यात केंद्र शासन व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास या योजेनेनुसार फाउंडेशन अंतर्गत महिला तसेच तरुणींसाठी लाखो रुपये फी असलेले फॅशन डिजाईनिंग, ब्युटी पार्लर तसेच हार्डवेअर या कोर्सचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.