चाळीसगाव एमआयडीसीतील कत्तलखाना होऊ देणार नाही ; आ मंगेश चव्हाण

0

चाळीसगाव (प्रतिनिधी -) काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात मंजुर असलेल्या तालुक्यातील खडकी एम आय डी सीतील कत्तलखाना सुरू झाल्यास शहराच्या शांततेस गालबोट लागु नये म्हणून वेळप्रसंगी माझी आमदारकी पणाला लागली तरी चालेल पण या होवू घातलेल्या प्लांटला एक वीट देखील लागु देणार नाही अशी माहिती आमदार मंगेश  चव्हाण यांनी दि 19 रोजी येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

आमदार चव्हाण यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, चाळीसगाव तालुक्यातील खडकी  येथील एम आय डी सी मध्ये D2 प्लॉट मध्ये 8 हजार स्क्वेर मीटर म्हणजे  8 लाख 61 हजार स्केअर फूट एवढ्या मोठ्या जागेवर मोहसीन ऍग्रो कंपनीला जागा दिली गेली आहे , या कंपनीच्या नावे येथे कत्तलखान्याचे (सॉल्डर प्लांट ) काम लोकसभा व विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याचा फायदा घेऊन युध्द पातळीवर सुरू करण्यात आले होते या घटनेची माहिती मिळाल्यावर आम्ही लागलीच काल भाजपचे पदाधिकारी, सहकारी व नगरसेवक यांच्या सोबत जागेवर जाऊन माहिती घेतली असता तेथे उपस्थित असलेल्या इसमांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, या होवू घातलेल्या प्लांटला विरोध करण्यासाठी तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे, सदर कत्तलखाना हा राज्यातील सर्वात मोठया प्लांट पैकी तयार होणार आहे

या प्रकल्पाला अनेक संघटनांनी विरोध केल्यावर मी व तत्कालीन आमदार उन्मेष पाटील व संघटनेचे पदाधिकारी यांनी विरोध करून पत्रव्यवहार केल्याचे सांगितले, या प्रकरणी मला कंपनीकडून बैठक घेण्याचे सांगण्यात आले , परंतु कंपनीच्या कोणत्याही  बैठकीला मी एकटा जाणार  नाही व यात तडजोड करणार नाही असे ही त्यांनी ठासून सांगितले,

पुढं अधिक माहिती देताना सांगितले की या 22 एकरच्या जागेवर शेकडो जनावरांची कत्तल होऊन शहराच्या शांतता सुव्यवस्थेला गालबोट लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्लांटला विरोध करण्यासाठीप्रसंगी माझी आमदारकी पणाला लागली तरी चालेल पण या कारखाण्याची एक विट देखील लागु देणार नाही असे देखील त्यांनी यावेळी सांगितले .

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष प्रा सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, वसंत चंद्रात्रे, माजी उपसभापती संजय पाटील, नगरसेवक विजया पवार, विजया प्रकाश पवार, बापू अहिरे, चंद्रकांत तायडे, सोमसिंग राजपूत, अनिल नागरे, शैलेश कोठारी, प्रेमचंद खिंवसरा, आण्णा कवडे, संजय कापसे, भुषण पाटील, जितू वाघ, यांच्या सह जय बाबाजी भक्त परिवार, भक्त पारायण परिवार, चाळीसगाव पुरोहित संघाचे पदाधिकारी, सदस्य व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.