मोटारसायकलींची समोरासमोर धडक ; दोन तरुणांचा मृत्यू

0

अपघाताची मालिका सुरूच

जळगाव (प्रतिनिधी): बाजार करून दुचाकीने घरी परतणार्‍या दोघांना समोरून भरधाव वेगाने येणार्‍या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दोघे तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी (दि.19)दुपारी 4 वाजेच्या सुमारास किनोद-फूफनी दरम्यान घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, भूषण विठ्ठल सोनवणे (वय-23) आणि रवींद्र भगवान सोनवणे (वय-27) दोन्ही रा. देवगाव ता. जळगाव हे दोघे जण जळगाव येथे रेशन धान्याच्याकामानिमित्त आले होते. जळगावातील काम आटपून दोघे दुचाकीवरुन (क्र. एम.एच. 19-0657) सायंकाळी चारच्या सुमारास घरी जात असतांना किनोद-फूफनी गावात दरम्यान समोरून अज्ञात भरधाव वेगाने येणार्‍या दुचाकीने जोरदार धडक दिली. यात भूषण सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला तर रवींद्र सोनवणे गंभीर रित्या जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन भूषणचा मृतदेह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. तर जखम झालेला रवींद्र सोनवणेला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

पुढील महिन्यात भूषणचे होते लग्न

अपघातात मृत्यू झालेल्या भूषण सोनवणचा मागील महिन्यात साखरपुडा झाला होता. 2 मार्च रोजी त्याचा विवाह होणार होता. त्यानिमित्ताने धान्य खरेदीसाठी तो जळगावी आला होता. भूषणच्या नातेवाईकांनी जिल्हा महाविद्यालयात आक्रोश केला.

Leave A Reply

Your email address will not be published.