निपाणे येथे मृगाचा रिमझिम शिडकावा

0

निपाणे ता, एरंडोल (वार्ताहर) : येथे रात्री आठ वाजेच्या सुमारास एक दम आभाळ भरून आले मोठमोठ्याने मेघ गर्जना झाली परंतु रिमझिम पाऊस फक्त अंगण ओले करून निघून गेला. मात्र, एरंडोल येथे संध्याकाळी ७-३० च्या सुमारास मेघ गर्जनेसह १५ ते २० मिनिटे जोरदार पाऊस झाला असल्याचे समजते

सध्या मृग सरी थोडयाफार प्रमाणात का होईना परंतु बरसत असल्याने शेतकरी वर्गात काही अंशी समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण रोहिणी नक्षत्राच्या शेवटी पाउस पडल्यामुळे चिंता वाढली आहे कारण रोहिणी नक्षत्रात पाउस पडला तर मृग नक्षत्र कोरडे जाते असे जाणकार सांगतात या दोन तीन दिवसात पाऊस येण्याचे संकेत मिळत असल्याने शेतकरी वर्ग कपाशी मका लागवडीसह पेरणीसाठी सज्ज झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.