निपाणे परीसरात धुळपेरणीस प्रारंभ शेतकऱ्यांना लागली पावसाची प्रतीक्षा

0

निपाणे, ता. एरंडोल (वार्ताहर) : मृग‌ नक्षत्र लागून ‌५-६ दिवस झाली असून मात्र अजून जोरदार पाऊस नसल्याने शेतकरी वर्गाला पावसाची प्रतीक्षा लागली आहे दररोज संध्याकाळी व‌ रात्री ढग भरून येतात ‌मेघ गर्जनाही होते. परंतु पाऊस काही कोसळत नाही हवामान खात्याने या दोन तिन दिवसात पाउस येण्याचा‌ अंदाज  वर्तविला असल्याने निसर्गाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी धुळ पेरणी सुरू केली असून कोरडवाहू कपाशी‌ व‌ मका लागवड सुरू केली आहे.

तसेच डबाळी काळ्या जमिनीत ज्वारी सोयाबीन ची‌ धुळ पेरणी सुरू केली आहे. मृग नक्षत्रात पेरणी झाली तर पिके ‌निरक व उत्पन्न देवून जातात म्हणून शेतकरी मृग नक्षत्राला विषेश महत्त्व देवून पेरणी करत असतो यंदा रोहीणी नक्षत्रात दोन तिन पाउस पडले आहेत त्यामुळे काही जाणकार शेतकरी म्हणतात रोहिणी नी‌ अंडा गायेल शेत मिरुग कोरडा जावानी शक्यता शे‌ परंतु आले. देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना शेवटी निसर्ग हा कोणाच्या हाती नाही मात्र ‌यंदा हवामान खात्याने‌ दिलेला‌ अंदाज ‌खरा ठरत असून दोन तिन दिवसात पाउस येण्याचा‌ अंदाज वर्तविला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी निसर्गाच्या भरवशावर धूळपेरणीला सुरवात केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.