निपाणे परीसरातील रानडुकरे, माकडांचा वन विभागाने त्वरीत बंदोबस्त करावा ; शेतकरी वर्गाची मागणी

0

 निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) : सध्या निपाणे सह परीसरात शेकडो रानडुकरे व  माकडांचा ठोंगा नजरेत पडत असून हि वन्य प्राणी  पुढे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे फार मोठे नुकसान करणार असल्याने वन विभागाने आजच त्यांचा बंदोबस्त करुन पद्मालय जंगलात हुलकून लावावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

सध्या परीसरात माकडे रानडुकरे यांचा त्रास जाणवू लागल्याने शेतकरी  वर्गाला पिकांचे संरक्षण करण्यासाठी रात्रं  दिवस संरक्षण करुन पहारा द्यावा लागत आहे. पुढे आणखी काही दिवसांनंतर मुग मका सह इतर पिके परिपक्व अवस्थेत तयार झाल्यावर खूप मोठे नुकसान शेती पिकांचे करणार असल्याने वन विभागाने आजच त्यांचा बंदोबस्त करणे काळाची गरज ठरली आहे. असे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे.

प्राणी संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक प्राणी मात्राला जिवन जगण्याचा अधिकार कायद्याने दिला असला तरी त्यासाठी वन मंत्रालयाने त्यांची सोय जंगलात केली आहे. शेतकरी वर्गाचे नुकसान करण्यासाठी नाही. आज जंगली प्राण्यांच्या वापरामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत भातखेडे चांदसर शिवारात बिबट्या वाघाचा संचार असल्याने दोन चार दिवसा आड हा बिबट्या गाई वासरांना ठार करत असतो. काही पशू पालक भरपाई मिळावी म्हणून वन विभागाकडे तक्रार दाखल करतात तर काही मुकाट्याने मुका मार सहन करतात ही वस्तुस्थिती आहे.  वन विभागाने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी माकडे रानडुकरे यांचा तरी बंदोबस्त करावा अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करत आहेत.

त्यामुळे या प्राण्यांनी  शेतकऱ्यांचे शेती पिकांचे कितीही नुकसान केले तरी  सहन करण्याची सहन शिलता हि  शेतकऱ्यात आहे. आता पिक हे पोटाच्या गोळ्या प्रमाणे जतन करावे लागत असल्याने शेतकऱ्यांचा अंत वनविभागाने पाहू नये. वेळीच या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत  आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.