264 कोटी खर्चून उभारलेला पूल कोसळला

0

पाटणा । बिहार राज्य सध्या दुहेरी संकटामध्ये सापडलं आहे. एकीकडे करोनाचा कहर तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरजन्य परिस्थिती. अशातच २९ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उद्घाटन केलेल्या पूलाचा एक भागच पाण्यात वाहून गेला. महत्वाची बाब म्हणजे हा पूल बांधण्यासाठी तब्बल २६४ कोटी रूपये खर्च करण्यात आले होते.

गोपालगंज येथील गंडक नदीवर सत्तरघाट महासेतू बांधण्यात आला होता. विविध जिल्ह्यांना जोडण्यासाठी हा महत्त्वाचा पूल होता. मात्र, तीन लाखांपेक्षा अधिक क्यूसेकने पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाचा एप्रोच रोड तुटला. हा पूल कोसळल्याने चंपारण, तिरहुत आणि सारण येथील अनेक जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे. या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. हा कोसळलेला पूल पाहण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली आहे.


दरम्यान, १६ जून रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या पूलाचं उद्घाटन केलं होतं. या पूलाची निर्मिती २०१२ मध्ये करण्यात आली होती. तसंच यासाठी २६४ कोटी रूपयांचा खर्च आला होता. दरम्यान गोपालगंजमध्ये बुधवारी ३ लाख क्युसेकपेक्षा अधिक पाण्याचा प्रवाह होता. या पाण्याच्या प्रवाहामुळेच हा पूल वाहून गेल्याचं सांगण्यात येत आहे. नदीवर असलेला हा पूल सध्या पूल वाहून गेल्यानं या पूलामुळे जोडल्या जाणाऱ्या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. लालछापर, मुजफ्फरपूर, मोतिहारी आणि बेतिया या गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.