निपाणे ग्रा.पं.प्रशासकपदी सौ.सुनंदा चौधरी

0

निपाणे ता एरंडोल (वार्ताहर) : निपाणे ग्राम पंचायत कमिटीचा कार्यभार संपूष्टात आला असून ग्राम पंचायत निवडणूक होई पर्यंत कार्यभार प्रशासक नियुक्त करून सोपवण्यात आला आहे निपाणे ग्राम पंचायतीवर प्रशासक म्हणून अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ, सुनंदा शामराव चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी सुनंदा मॅडम यांनी दि,१८ सप्टेंबर रोजी गावात येऊन माहिती जाणून घेतली लवकरच सरपंच सरुबाई प्रकाश भिल ह्या प्रशासक सुनंदा चौधरी मॅडम यांच्या कडे चार्ज देतील निपाणे येथे सुनंदा चौधरी यांचा ग्रा, पंचायत, कमिटी तर्फे सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना सुनंदा चौधरी मॅडम म्हणाल्या की प्रशासक म्हणून काम करत असतांना पदावरआहे तो पर्यंत गावकऱ्यांनी मला सहकार्य करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना माजी सरपंच कमलाकर पाटील यांनी केली तर आभार उपसरपंच आशाबाई जाधव यांनी मानले यावेळी सर्व ग्रा,पंचायत, कमिटी तील सदस्य उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.