ना.गुलाबराव पाटलांच्या वाढदिवसानिमित्त पाळधीत शिवसेनेची बैठक

0

पाळधी, ता.धरणगाव :- जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील धरणगाव व जळगाव तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची बैठक सहकार राज्यमंत्री व तथा शिवसेनेचे उपनेते  ना. गुलाबराव पाटील  यांच्या वाढदिवसानिमित  विचारविनिमय करण्यासाठी  तसेच  पक्ष वाढीसाठी व कार्यकर्त्यांच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी बैठक  आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील उपस्थित राहणार आहे.

सदर बैठक दि १ जूनल रोजी शुक्रवारी  दुपारी 4 : 00  पाळधी येथील श्रीराम मंदिर हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना, युवासेना, महिला आघाड़ी, एस. टी. कामगार सेना, शिक्षक सेना, ग्राहक स्वसंरक्षण कक्ष यांचे पदाधिकारी, उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख ,उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख ,त्या-त्या  गावचे बूथप्रमुख , ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच, सदस्य व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व संचालक, मार्केट कमिटीचे सभापती, उपसभापती व संचालक शासकीय समित्यांचे पदाधिकारी व सदस्य तसेच  लोकप्रतिनिधी  सर्व आजी – माजी नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांची  बैठक आयोजित केली आहे.

बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हासंघटक जळकेकर महाराज  हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी बैठकीला वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन – शिवसेना उपजिल्हाप्रमुख  पी. एम. पाटील सर, रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख गजानन पाटील, राजेंद्र चव्हाण,विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, धरणगाव शहरप्रमुख राजेंद्र  महाजन यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.