ना. गुलाबराव पाटलांचा उद्या धरणगावात नागरी सत्कार

0

धरणगाव (प्रतिनिधी) : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी गुलाबराव पाटील विराजमान झाल्याने जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघा तर्फे भव्य नागरी सत्कार समारंभ उद्या दि७ शुक्रवार रोजी संध्याकाळी ७-०० वा साने पटांगण कोट बाजार येथे आयोजित केलेल्या आहे.

तसेच नुकतेच धरणगाव शहर न पा पोटनिवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निलेश सुरेश चौधरी व धरणगाव प स सभापती मुकुंद ननावरे, तर उपसभापती पदी शारदाताई प्रेमराज पाटील तसेच जळगांव प स सभापती पदी नंदलाल पाटील  तर उपसभापती पदी संगिताताई चिंचोरे यांची निवड झाल्याबद्दल या नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा ही सत्कार समारंभ संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेनेचे जळगांव लोकसभा संपर्क प्रमुख मा संजय सावंत तर प्रमुख अतिथी म्हणून आ चिमणराव पाटील, मा आ किशोर आप्पा पाटील, मा आ चंद्रकांत पाटील,आ सौ लताताई सोनवणे, काँग्रेस चे प्रदेश सचिव  डी जी पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्या उपस्थितीत होणार आहे सदर या भव्य नागरी सत्कार समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन धरणगाव तालुका महाविकास आघाडी चा पदाधिकारी यांनी केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.