नासा पाठविणार मंगळावर लहान हेलिकॉप्टर

0

न्यूयॉर्क ;– २०२० मध्ये मंगळावर अमेरिकेची नासा ही अवकाश संशोधन संस्था लहान हेलिकॉप्टर पाठवणार असून ते निर्मनुष्य ड्रोन सारखे असणार आहे. त्याचा उपयोग मंगळाच्या संशोधनासाठी होणार आहे.

या उपकरणाचे नाव दी मार्स हेलिकॉप्टर असे असून त्याचे वजन चार पौंड म्हणजे १.८ किलो आहे. सॉफ्टबॉलच्या आकाराचा त्याचा मुख्य भाग आहे. रोव्हर गाडीला हेलिकॉप्टर मार्स २०२० लावले जाणार आहे. मंगळावरील वातावरण वसाहतीस योग्य आहे की नाही याचा अंदाज रोव्हर गाडी घेईल.

तेथील नैसर्गिक साधनसंपत्ती व पूर्वीच्या सजीवसृष्टीचे पुरावे, मानवाला तेथे असलेले संभाव्य धोके यांचाही अभ्यास यात केला जाणार आहे. जुलै २०२० मध्ये मार्स २०२० मोहीम आयोजित करण्यात आली असून रोव्हर गाडी हेलिकॉप्टरसह फेब्रुवारी २०२१ मध्ये मंगळावर पोहोचेल. अवकाश इतिहासात अनेक गोष्टी प्रथम करण्याचा मान नासाने मिळवला आहे, त्यात मंगळावर हेलिकॉप्टर पाठवण्याचा उपक्रमही समाविष्ट आहे, असे नासाचे प्रशासक जिम ब्रिडनस्टाइन यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.