हिमाचल प्रदेशात बस कोसळून ६ प्रवासी ठार

0

शिमला ;- हिमाचल प्रदेशमधील सिमलापासून सुमारे ७० किमी दूर सोलन-राजगड येथे नईनेती ठिकाणी एका खोल दरीत खासगी प्रवासी बस कोसळून झालेल्या अपघातात सहा प्रवासी ठार तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.

ही बस मानव येथून राजगड येथे जात होती. त्याचवेळी ही बस दरीत कोसळली. अपघात झाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांनाही माहिती दिली. अजूनही मदतकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज (रविवार) सकाळच्या सुमारास घडली.मोटरसायकलला साइड देताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस 200 फूट खोल दरीत कोसळली .

Leave A Reply

Your email address will not be published.