नाशिकमधील घटना हृदय पिळवटून टाकणारी- नरेंद्र मोदी

0

नाशिक : महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याने २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या रुग्णालयात अनेक रुग्ण व्हेंटिलेटरवर होते.   दरम्यान, या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

“ऑक्सिजन टँक लीक झाल्यामुळे नाशिकमधील रुग्णालयात घडलेली घटना ही हृदय पिळवटून टाकणारी आहे. यात जीवितहानी झाल्यानं मन हेलावलं आहे. दु:खाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबीयांचं सांत्वन,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना शोक व्यक्त केला.

तर, चंद्रकांत पाटील यांनीही घटनेच्या सखोल चौकशीही मागणी केली आहे. त्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही चौकशी होणारच, असं स्पष्टीकरण दिलंय. तसेच, या घटनेचे कोणीही राजकारण करू नये, असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.