नाशिक,जळगाव जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता

0

पुणे :- येत्या पुढील 24 तासांत पुणे, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण उडाली आहे. त्यातच हवामान खात्याने आज अतिवृष्टीचा इशारा दिला. कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. कोकणात अनेक ठिकाणी शंभर मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर आठ ठिकाणी 200 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. रत्नागिरीतील हेदवी येथे सर्वाधिक 245 मिलिमीटर पाऊस पडला. पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रात कोल्हापूरसह नाशिक, पुणे, सातारा, नगर आणि जळगाव जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा, विदर्भात हलक्‍या ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांतही कमी अधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. बंगालच्या उपसागरात कमीदाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, तीव्र होत असलेल्या प्रणालीमुळे मॉन्सून सक्रिय होऊन, राज्यात पाऊस जोर धरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.