नाथाभाऊ आमचे जुने सहकारी, मी त्यांना भेटणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पक्षाच्या नेतृत्वावर नाराज असून त्यांनी अनेकवेळा आपली नाराजी व्यक्त केली आहे. खडसे यांनी सोमवारी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. दरम्यान, नाथाभाऊ आमचे जुने सहकारी आहेत. त्यांनी भेटायची इच्छा व्यक्त केली आहे. मी त्यांना भेटणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी खडसे यांना भेटीची वेळ देणार असल्याचं नमूद केलं आहे.

दरम्यान, राज्यातील भाजपा नेतृत्वावरुन खडसेंनी पक्षाकडून असाच अन्याय होत राहिल्यास मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही दिला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या भेटीगाठी महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.