नागरिकांचे वीज कनेक्शन सरसकट तोडू नये

0

अमरावती (प्रतिनिधी) : कोरोनामुळे गेल्या वर्षभरातील नागरिकांची विस्कटलेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन महावितरण कंपनीकडून नागरिकांची वीजजोडणी सरसकट तोडण्यात येऊ नये अशी मागणी भाजपा नेते सभागृहनेता तुषार भारतीय यांनी वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता यांच्याकडे केली आहे .

वीज वितरण कंपनीकडून थकबाकीदार वीज ग्राहकांची वीज तोडण्याची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे . या पार्श्वभूमी वर तुषार भारतीय यांनी वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर केले .

अमरावती शहर तसेच जिल्ह्यामध्ये, मुंबईला विधानसभा अधिवेशन आटोपल्यावर .  कुठलीही वास्तविक स्थिती लक्षात न घेता सरसकट वीज कनेक्शन तोडणी सुरू आहे  . सध्या परीक्षेचे वातावरण आहे कोरोणा संकटामुळे गेल्या वर्षभरापासून व्यापार , रोजगार , कारखाने, मजुरी जवळजवळ बंद आहे . त्यामुळे वर्षभर वीज बिल भरण्यात आले नाही . एकदम हजारो रुपये भरणे शक्य नाही म्हणून या बाबत खालील मुद्यांचा विचार करून वीज ग्राहकांना सवलत देण्याबाबत निर्णय करून जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना तसे निर्देश द्यावे .

वीज ग्राहकांना वीज देयकांची सरसकट पाच टप्पे करून देण्यात यावे . सौभाग्य  योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या कनेक्शनच्या बिल  वसुलीसाठी सक्ती करण्यात येऊ. नये ज्या ग्राहकांच्या वीज मीटर बाबत तक्रारी आहेत त्या वीज मीटरची तपासणी करून योग्य ती कारवाई करावी . तोपर्यंत 25 टक्के पेक्षा जास्त वीज बिल भरून घेऊ नये . ग्रामीण भागात बंद पडलेल्या ट्रांसफार्मर 24 तासाच्या आत दुरुस्त करण्यात यावी  अशी मागणी भाजपाचे नेते तथा मनपा सभागृह नेता तुषार भारतीय यांनी यावेळी मुख्य अभियंता यांच्याकडे केली . चर्चेच्या वेळी आशिष अतकरे , बलदेव बजाज , राहुल बलखंडे , राजेश जगताप , अंकुश मोहोळ , रोशन पूनिया  , प्रशांत कुमार , प्रशांत शेगोकार आदी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.