नागरिकत्व कायद्याविरोधात देशात आंदोलने सुरूच !

0

नवी दिल्ली/मुंबई : सुधारीत नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी आज देशभर निदर्शने करण्यात आली. जागोजागी धरणे, रास्ता रोको, मोर्चे यांचे आयोजन करण्यात आले होते. विरोधी पक्षासह अनेक सामाजिक संघटना या राष्ट्रीय आंदोलनात उतरल्या होत्या. दरम्यान, मुंबईमधील ग्रॅन्टरोड, नाना चौक परिसरात आंदोलकांची प्रचंड गर्दी जमली आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग आहे.

राजधानी दिल्लीत निदर्शकांनी जमावबंदीचे प्रतिबंधात्मक आदेश मोडून हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. लाल किल्लयाजवळ नागरिक गोळा होण्यास सुरवात झाली. या भागात निदर्शने करण्याचे आंदलनकर्त्या संघटना आणि विरोधी पक्षांनी सुचित केले होते. पोलिसांनी या निदर्शनांना परवानगी नाकारली. त्यानंतर पोलिसांनी 144 हे जमावबंदीचे कलम लागू केले. तरीही मोठ्या संख्यने नागरिक जमा होऊ लागले. पोलिसांना त्यानंतर आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरवात केली. अटक केलेल्या नेत्यांमध्ये स्वराज्य अभियानचे प्रमुख योगेंद्र यादव यांचा समावेश होता. मला लाल किल्ल्यातून आत्ताच ताब्यात घेतले आहे. हजारो लोकांची पोलिसांनी धरपकड केली आहे. हजारो त्या मर्गावर आहेत. मला बावना येथे नेत असल्याचे सांगण्यात आले आहे, असे ट्विट यादव यांनी केले आहे.

मध्य दिल्लीत निदर्शनाचे लोण पसरले. त्यामुळे जंतर मंतर येथे निदर्शकांनी आंदोलन सुरू केले. कासे आजादी एनआरसीसे आझादी अशा घोषणा निदर्शक देत होते. तिरंगा ध्वजही आंदोलकांनी सोबत आणलेला होता. रविवारी हिंसाचार उफाळला होता त्या जामिया मिलिया इस्लामिया भागात आंदोलनावर पोलिसांनी निर्बंध घातले होते.

दिल्ली मोट्रो कॉर्पोरेशनने 20 स्थनके बंद ठेवली होती. ही सर्व स्थानके मध्य दिल्लीतील आहेत. पोलिसांनी गुरगावच्या सीमेवर बॅरीकेड लावली. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यातच आंदोलनामुळे 16 विमाने उशीरा धावली. राजधानी दिल्लीत प्रथमच मोबाईल सेवा खंडित करण्यात आली. पोलिसांच्या सुचनेनुसार मोबाईल कंपन्यांनी उत्तर आणि मध्य जिल्ह्यातील मोबाईल सेवा खंडित केली. सीलामपूर, जाफराबाद, मुस्तफाबाद, शाहीन बाग आणि मंडी बागातही ही कारवाई करण्यात आली.

खरे तर पोलिसांनी सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही बराच कजाळ मोबाईल सेवा खंडितच ठेवली होती. राजधानी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेली आणि डाव्या पक्षांनी आयोजित केलेली अशी दोन निदर्शने अनुभवली. हे दोन्ही मोर्चे शाहीन बागेजवळ एकत्र आले.

Leave A Reply

Your email address will not be published.