राजधानी दिल्लीत भीषण वाहतूक कोंडी

0

नवी दिल्ली : सुधारीत नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी आज देशभर निदर्शने करण्यात आली. जागोजागी धरणे, रास्ता रोको, मोर्चे यांचे आयोजन करण्यात आले होते. विरोधी पक्षासह अनेक सामाजिक संघटना या राष्ट्रीय आंदोलनात उतरल्या होत्या. दरम्यान, राजधानी दिल्लीतील विविध भागांमध्ये मोर्चे आणि निदर्शनं झाल्यामुळे ठिकठिकाणी भीषण वाहतूक कोंडी झाली. ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेले दिल्लीकर दोन तासात अक्षरशः एक किलोमीटरही पुढे सरकलेले नव्हते.

दरम्यान दिल्ली शहरात दाखल होणारी वाहनं रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांवर बॅरिकेट्स लावण्याची वेळ आली. पोलिसांच्या आदेशानुसार दिल्ली मेट्रोने आज सकाळी 14 मेट्रो स्थानकांची प्रवेशद्वारं बंद केली होती. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वर वाहतूक कोंडी झाल्यामुळे 16 विमानांची उड्डाणं विलंबाने होत आहेत. तर ‘इंडिगो’ विमान कंपनीने 19 फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. क्रू मेंबर्स शहरातील वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.