नागरिकता संशोधन कायदा (सी.सी.ए.) समर्थनार्थ पाचोऱ्यात आज भव्य मोर्चा

0

पाचोरा –    केंद्र सरकारने नुकताच सी.सी.ए. व एन.आर.सी. हा नागरिकत्व कायदा संसदेत पारित केला असुन या कायद्या समर्थनार्थ येथील राष्ट्रीय सुरक्षा मंचातर्फे हे विधेयक संविधानाच्या विरोधात नाही, हे विधेयक मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही, हे विधेयक कुठल्याही जातीच्या विरोधात नाही, पाकीस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातुन आलेल्या अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व देणारे आहे,

या तिन्ही देशांमध्ये अल्पसंख्याकांची संख्या खुप कमी झाली आहे. ते लोक एक तर मारले गेले असतील किंवा त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर केले असेल किंवा ते भारतात आश्रयासाठी आले अशा लोकांना भारतीय नागरिकत्व देणारे हे विधेयक असेल, या तिन्ही देशांमध्ये ज्यांना धर्माच्या आधारावर पिडित करण्यात आले त्यांचे संरक्षण करणारे हे विधेयक आहे. या विषयांच्या समर्थनार्थ  आज दि. ३० रोजी सकाळी १० वाजता कृष्णापुरी ते तहसिल कार्यालया पर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या भव्य मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय सुरक्षा मंचातर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.