नशिराबाद येथे गोळीबार ; एक ठार एक जखमी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

नशिराबाद येथील उड्डाणपुलाजवळ गोळीबारात झाल्याची घटना मंगळवारी (२१ सप्टेंबर) रोजी संध्याकाळी ६:४५ वाजेच्या सुमारास घडली. असल्याची माहिती मिळाली आहे.

जळगाव कारागृहात असलेल्या मुलाचा जामीन करून त्याला घरी नेत असलेल्या पितासह पुत्रावर मारेकऱ्यांनी भीषण हल्ला केला. यामध्ये नुकताच जेलमधून सुटून बाहेर निघालेला मुलगा ठार झाला असून पिता हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी पित्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमी झालेला पिता मनोहर सुरळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी ११ ऑक्टोबर २०२० रोजी भुसावळ येथील कैफ शेख जाकीर याचा खून झाला होता. त्याच्या खुनाच्या प्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. यातील एक संशयित धम्मप्रिया मनोहर सुरळकर हा जळगाव जिल्हा कारागृहात होता.

दरम्यान मंगळवारी २१ सप्टेंबर रोजी त्याला जामीन मिळाला. त्याच्या जामिनासाठी त्याचे वडील मनोहर आत्माराम सुरळकर (वय ४७, रा. पंचशील नगर, भुसावळ) हे आले होते. धम्माप्रियाचा जामीन झाल्यावर ते घराकडे परतत जात असताना नशिराबादच्या पुलाजवळ संशयित मारेकरी समीर शेख जाकीर, चादर वाल्याचा मुलगा (पूर्ण नाव माहित नाही) व आणखी एक जण दबा धरून बसले होते.

दोघेही पितापुत्र पुलाजवळ आले असता त्यांनी अचानक दोघा पितापुत्रावर हल्ला केला. यात त्यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या तर चोपर, चाकूने सपासप वार करीत पिता-पुत्रांना बचावाची संधी दिली नाही. यात दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले.

याप्रसंगी पोलिसांनी जखमींना  डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तेथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. धम्मप्रिया सुरळकर हा मयत झाला असून त्याचे वडील मनोहर सुरळकर यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.