नवी दिल्लीतील कारखान्यात आग; अनेक जण अडकले

0

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये एका बॅटरीच्या कारखान्यात भीषण आग लागून स्फोट झाल्याची घटना आज पहाटे घडली आहे,   कारखान्याला लागलेल्या आग आटोक्‍यात आणण्यासाठी अग्नीशामक दलाचे 35 बंब घटनास्थळी रवाना झाले आहेत. तेथे झालेल्या स्फोटात अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांसह अनेक जण अडकले आहेत.

पहाटे 4 वाजून 23 मिनिटांनी उद्योगनगरमधील पीराग्रही भागातील कारखान्याला आग लागली असल्याचा फोन आला. त्यावेळी सात बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले,असे दिल्ली अग्नीशमन विभागाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले.

मात्र आग आटोक्‍यात आणण्याचे प्रयत्न सुरु असताना तेथे स्फोट झाला. त्यामुळे इमारतीचा काही भाग कोसळला. त्यात अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांसह काही जण अडकले. तेथे मदत कार्य सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.