नरेंद्र  मोदी  विचार मंचच्या उपाध्यक्षपदी  प्रा. प्रशांत पाटील

0
भुसावळ दि. 23-
येथील नाहाटा महाविद्यालयातील भूगोल विभागात कार्यरत असलेले प्रा. प्रशांत विजय पाटील यांची मा. नरेंद्र मोदी विचार मंचच्या भुसावळ तालुका उपाध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आलेली असून नियुक्तीचे पत्र त्यांना नुकतेच तालुकाध्यक्ष नारायण कोळी यांचेहस्ते देण्यात आले. या मंचाच्या माध्यमातून  मा. पंतप्रधान  नरेंद्र  मोदी  यांचे विचार समाजातील सर्वात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आदेश त्यांना प्राप्त झालेले आहेत. तसेच समाजात सामाजिक जागरुकता, तसेच सार्वजनिक सेवा सुविधा उपेक्षितांपर्यंत पोहचविण्याचे कमी काम करणे हा या मंचाचा उद्देश आहे.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे माजी महसूलमंत्री आ. एकनाथराव खडसे, खा. रक्षाताई खडसे, आ. संजय सावकारे, रोहिणी खडसे, नगराध्यक्ष रमण  भोळे, उपनगराध्यक्षा  लक्ष्मी मकासरे, भाजपा जळगाव जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा. डॉ.सुनील नेवे, भाजपा भुसावळ शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, भुसावळ  शहर  भाजपा  सरचिटणीस  पवन बुंदेले, रमाशंकर  दुबे, भाजयुमो हराध्यक्ष अनिकेत पाटील, मा. नरेंद्र मोदी विचार मंच तालुकाध्यक्ष नारायण कोळी, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. मोहन फालक, चेअरमन मा.
महेश फालक, कोषाध्यक्ष संजयकुमार  नाहाटा, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.  मिनाक्षी वायकोळे,उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, डॉ. बी. एच. बर्‍हाटे, डॉ. ए. डी. गोस्वामी, प्रा. एन. ई. भंगाळे यांनी कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.