पेठच्या ग्रामसभेत भोगवट्याच्या जागेवरून गोंधळ

0
वाद सोडविण्यासाठी समिती गठित : गोंधळात सभा उरकली
पहूर ता. जामनेर दि. 23- खंडेराव नगरातील गावठाण मालमत्ता 297 क्रमांकाच्या भोगवट्याच्या जागेवरून सत्ताधार्‍यांसमोर प्रश्न उपस्थित होताच संबंधित महिला भोगवटादारासह नांगरीकांनी संतप्त भावना व्यक्त केल्याने गोंधळ उडाला. हि बाब लक्षात घेऊन सत्ताधार्‍यांनी गोंधळातच आभार व्यक्त करून सभा आटोपती घेतली आहे. मात्र सभा पूर्ण झाल्याचे सत्ताधार्‍यांनी सांगितले आहे.
पेठ ग्रामपंचायतमध्ये गुरुवारी झालेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य
शरद पांढरे होते. यावेळी सरंपच निता रामेश्वर पाटील, उपसरपंच रवींद्र मोरे, माजी जि. प. सदस्य राजधर पांढरे, सरपंचपती रामेश्वर पाटील, संतोष चिंचोले, श्यामराव सावळे, शैलेश पाटील, ईश्वर देशमुख, विजय पांढरे, सलीम शे.गणी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यादरम्यान गावातील विविध विषयांवर सुरळीत चर्चा सुरू होती. खंडेरावनगरातील गावठाण मालमत्तेचा 297 क्रमांकाच्या भोगवटादार सुमन भागवत पांढरे यांनी या जागेसंर्दभात प्रश्न उपस्थित करताच
मधुकर देशमुख, भाऊराव गोंधनखेडे, शैलैश पाटील, विजय पांढरे यांनी महिलेच्या बाजूने भुमिका घेत महिलेच्या नावे कागदोपत्री भोगवटा असताना जागेचा ताबा का देत नाही? अशा स्वरूपात संतप्त भावना व्यक्त झाल्यानंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हे लक्षात घेऊन सत्ताधार्‍यांनी आभार व्यक्त केले व सभा आटोपती घेतली आहे. मात्र सरंपचपती रामेश्वर पाटील यांनी सभा पूर्ण झाल्याचे सांगितले आहे.
जागेचा वाद मिटविण्यासाठी समिती गठीत
यावेळी सभेचे अध्यक्ष शरद पांढरे यांनी या जागेचा वाद मिटवण्यासाठी पंचमंडळ गठीत केल्याचे जाहिर केले. व पंचमंडळ योग्य ती चौकशी करून निर्णय घेतला जाईल, असेही पांढरेंनी सांगितले आहे. या पंच मंडळात राजधर पांढरे, साहेबराव देशमुख, अरूण घोलप, भाऊराव पाटील, भिका पाटील, विजय पांढरे, यांचा समावेश आहे. या वादग्रस्त जागेचा मागील महिन्यात पंचनामा
ग्रामपंचायतच्या वतीने केला असता हि जागा भाऊलाल त्र्यंबक पाटील यांच्या कब्जात असून त्यांचे शेतीची औजारे व गुरेढोरे तेथे असल्याचे आढळून आल्याची माहिती सरंपच पती रामेश्वर पाटील यांनी सांगितले आहे. तर जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांनी तक्रारदार महिलेला मदत करून हा प्रश्न मिटवावा, असे त्यांनी दिलेल्या शिफारस पत्रात स्थानिक पदाधिकार्‍यांना सुचविल्याचे पत्रही या महीलेने सभेत दाखविले आहे.त्यामुळे पेठ ग्रामपंचायतच्या सत्ताधार्‍यांच्या भुमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
सभेची सुचना देऊनही गावातील विविध विभागाचे शासकीय अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे काही नागरीकांचे प्रश्न अंधातरी राहिले आहे. याचबरोबर अवैध नळ कनेक्शन कट करण्याविषयी चर्चा झाली. तसेच शेतात बी लावणी पासून ते काढणीपर्यंतच्या कामाचा समावेश रोजगार हमी योजनेत करून शेतकर्‍यांच्या लाभाच्या योजनांचे फलक लावण्याचे संतोष चिंचोले यांनी सुचविले. कर्ज माफी झालेल्या पण त्याचा लाभ न मिळालेल्या
शेतकर्‍यांचा प्रस्ताव संबंधित बँकासह शासनाकडे पाठविण्याचा ठराव यावेळी करण्यात आला आहे. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिक्रिया
सबंधित जागेची तत्कालीन सरंपचांनी पाहणी न करता या जागेचा भोगवटा लावला आहे. याचा तोडगा काढण्यासाठी पंचमंडळीची समिती गठित केली असून ग्रामपंचायत पेठच्या वतीने मागील महिन्यात पंचनामा करण्यात आला आहे. तसेच जे शासकीय अधिकारी सभेला उपस्थित नव्हते, त्यांची संबंधित शासकीय विभागाच्या वतीने चौकशी करण्यात येईल.
निता रामेश्वर पाटील, सरंपच पेठ
पंचवीस वर्षात मी अनेकांचे भोगावटे लावले आहेत. पण माझ्या कार्यकाळात एकहि चूकीचा भोगवटा लावलेला नाही. त्यामुळे संबंधित महिलेचाही भोगवटा लावताना काही चूक झाली नाही. यामुळे वाद उद्भवला असेल तर तो वाद समोपचाराने मिटवावा.
प्रदिप लोढा माजी सरंपच पेठ
माझ्या नावे या जागेचा ग्रामपंचायत च्या कागदोपत्री भोगवटा लागला असून त्याचे कररूपात शूल्क भरले आहे. मला अजूनही जागेचा ताबा दिला जात नाही. यासाठी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी हि स्थानिक पदाधिकार्यांना मला मदत करण्यासाठी शिफारस पत्र दिले आहे.
सुमन भागवत पांढरे
तक्रारदार तथा भोगवटादार पेठ

Leave A Reply

Your email address will not be published.