पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन

0
भुसावळ,दि. 23-
पु. ओ. नाहाटा महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचा उद्घाटनाचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात  आला  होता.  वाणिज्य  मंडळाचे  उद्घाटन    डी.  एन.  पारख,  अतिरिक्त  आयकर  उपयुक्त, जळगाव यांचेहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी आयकर हा भार नसून राष्ट्राच्या जडणघडणातील करदात्याचे योगदान असून इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातील आयकराचे दर कमी असल्याचे नमूद
केले. तसेच त्यांनी आयकर कसा आकारला जातो, याबाबत ही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व प्रमुख वक्ते  शकील अहमद अन्सारी, आयकर उपायुक्त, आदी उपस्थित होते. त्यातून त्यांनी राष्ट्राच्या आर्थिक व भौगोलिक विकासात करदात्यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारला कर स्वरूपात मिळालेल्या उत्पन्नामुळे इतर देशांच्या तुलनेत भारताने जागतिक स्तरावर विशेष स्थान प्राप्त केले आहे. तसेच प्रत्येक नागरिकाने आपले पॅन कार्ड तयार करून नियमितपणे मुदतीच्या आत स्वेच्छेने भरावे, असेही सांगितले. त्यामुळे देशातील
कर भरणार्‍या लोकांच्या एकूण प्रमाणात वाढ होऊन सरकारच्या नियमित उत्पनात वाढ होईल व सरकार कडून दिल्या जाणार्‍या विविध सुविधांच्या गुणवत्तेत भर पडेल. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एम. व्ही. वायकोळे यांनी अध्यक्षस्थान भूषवले तर प्रमुख अतिथी म्हणून  डी. एन. पारख, शकील अहमद अन्सारी,कृष्णमूर्ती अय्यर, आयकर अधिकारी, जळगाव, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एन. ई. भंगाळे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. व्ही. जी. कोचुरे इ. व्यासपीठावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य मंडळाचे चेअरमन प्रा. डॉ. पी. के. पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयकर अधिकारी, जळगाव तसेच वाणिज्य व अर्थशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  प्रा.  डॉ.  ममता  पाटील  यांनी  केले  व  आभार प्रदर्शन प्रा. एस. टी. धूम  यांनी
केले.

Leave A Reply

Your email address will not be published.