नदी पात्रात अडीच तास थांबून अवैध वाळू वाहतुकीचे दोन ट्रॅक्टर पकडले

0

भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यात गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू आहे. या बाबत भडगाव तहसिलदार सागर ढवळे यांनी अवैध वाळू उपसा बाबत कारवाई ची मोहीम सुरू केली आहे. स्वतः तहसिलदार यांनी गिरणा नदी पात्रात अडीच तास थांबून अवैध वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरची वाट पाहिल्यानंतर रात्री दोन वाजता दोन ट्रॅक्टर वाळू भरण्यासाठी आले व  ट्रॅक्टर वर तहसिलदार बसून त्यांना कार्यालयात जमा करण्यात आल्याची घटना दि 16 रोजी रात्री घडली या बाबत अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.

 

या बाबत अधिक असे की, दि.१६-२-२०२१ रोजी पहाटे २.३० वाजता भडगाव तहसिलदार सागर ढवळे, लिपिक चेतन राजपूत, लिपिक संदीप बडे , ड्रायव्हर  विष्णू तायडे यांच्या पथकाने पिंपळगाव गावाजवळ     रात्री ११ वाजता गिरना नदीत जाऊन २-३० तास लपून वाट बघून २ वाळूचे ट्रॅक्टर नदी पात्रात पकडले , तसेच ट्रॅक्टर नदीतून काढताना तहसीलदार ,तसेच त्यांचे लिपिक स्वतः ट्रॅक्टर मधे बसून  तहसील कचेरी पर्यंत आले.

 

या वेळी पोलिस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत  ट्रॅक्टर जमा करण्यात आले. गिरणा नदी पात्रात मध्यरात्री अडीच तास थांबून तहसीलदारांनी वाट पाहण्याची पहिलीच घटना आहे. अवैध वाळू बाबत अशीच कारवाई या पुढेही  महसूल विभाग चालू ठेवेल अशी माहिती तहसिलदार सागर ढवळे यांनी दैनिक लोकशाही ला दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.