अन्यथा जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन होणार; जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिला ‘हा’ इशारा

0

जळगाव : राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्यानं आरोग्य प्रशासन अलर्ट झाल्या आहेत. पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.

 

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कोरोना रुग्ण संख्येत वाढ होतानाचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली विविध यंत्रणांची तातडीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता नागरीकांना काही बंधने पाळावीच लागतील, अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. असे इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे. तसेच घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला मास्क बंधनकारक असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देखील शासकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत. सात दिवस करोनाचे रुग्ण वाढतच राहीले तर लॉकडाऊन अनिवार्य असेल असेही त्यांनी सांगीतले आहे.

 

यांची होती उपस्थिती

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिलहा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उप जिल्हाधिकारी तुकारात हुलवळे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ रावलाणी यांचेसह टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.

 

मास्क नाही तर प्रवेश नाही

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यापुढे शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, हॉटेल, रेस्टॉरंट, लॉन्स, मंगल कार्यालये, मॉल्स, उद्याने, क्रीडांगणे, सार्वजनिक प्रवाशी वाहतुक करणाऱ्या यंत्रणा या गर्दीच्या याठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले. जे नागरीक मास्क वापरणार नाहीत, त्यांच्‍यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पोलीस विभागास दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.