कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बुलडाणा जिल्ह्यात संचारबंदी ; शाळा, महाविद्यालय, क्लासेस बंद

0

बुलडाणा : आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, 1897, शासन आदेश दिनांक 29/01/2021 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) (3) मधील तरतुदीनुसार कोविड-19 चा प्रादुर्भाव व फैलाव होवू नये या करिता सामाजिक अंतर व इतर आवश्यक उपाययोजनेचा अवलंब करून बलडाणा जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरिता खालील प्रमाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बुलडाणा यांनी खालील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहे.

1)बुलडाणा जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरिता संचारबंदीचे आदेश पारीत करण्यात येत असून त्यानूसार शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्र जमू नये.

2) सर्व प्रकारच्या वेळोवेळी आयोजित करण्यात येणा-या धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामुहीक कार्यक्रम, सभा, बैठका ई. करिता केवळ 50 व्यक्तींना उपस्थित राहता येईल. तसेच मिरवणूक व रॅली काढण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात येत आहे. या बाबत स्थानिक प्रशासन व पोलीस विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.

3) लग्नसमारंभाकरिता केवळ 50 व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल. सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील. लग्न समारंभाकरिता रात्री 10.00 वाजेपर्यंतच परवानगी अनुज्ञेय राहील, या बाबत स्थानिक प्रशासन व पोलीस विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी. मर्यादेपेक्षा अधिक व्यक्ती दिसुन आल्यास आयोजक आणि मंगल कार्यालये/बंक्वेट हॉल मालक/लॉनचे मालक यांचेवर योग्य कारवाई करावी.

4) लग्नसमारंभाच्या नियोजित स्थळाव्यतिरिक्त इतर ठिकाणी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी.

5) हॉटेल्स/ पानटपरी/ चहाची टपरी/ चौपाटी इत्यादी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर व सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणे बंधनकारक राहील. या ठिकाणी नागरीकांची गर्दी होत असल्याचे आढळून आल्यास स्थानिक प्रशासन यांनी नियंत्रण ठेवण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. त्याच प्रमाणे सदर नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आढळून आल्यास, उपरोक्त वाचा मधील आदेश क्रमांक 5 दिनांक 15/04/2020 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार, संबंधीत व्यवसायीक  दुकानदार व्यक्ती यांचेवर पोलीस विभाग, संबंधीत नगरपालिका/स्थानीक स्वराज्य संस्था यांनी दंडात्मक कारवाई करावी.

6) बुलडाणा जिल्हयातील सर्व धार्मिक संस्था /प्रार्थना स्थळे यांनी त्यांचे संस्थान मस्जीद/मंदीर/चर्च व इतर धार्मिक संस्थानामध्ये कार्यक्रमामध्ये गर्दी होणार नाही या दृष्टने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच सोशल डिस्टंसिंग व मास्कचा वापर बंधनकारक राहील. या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास त्यांचे विरुध्द स्थानीक प्रशासन व पोलीस विभागांनी नियमानुसार कारवाई करण्यात यावी.

7) बुलडाणा जिल्हयातील सर्व बाजारपेठांमध्ये नागरीकांची गर्दी होणार नाही या बाबत स्थानिक प्रशासन (नगरपरिषद/ नगर पंचायत /ग्राम पंचायत ) यांनी दक्षता घेवून व आवश्यक पथकाचे गठण करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना त्यांचे स्तरावरुन करुन गर्दीस प्रतिबंध करण्यात यावा. बुलडाणा जिल्हयामधील ईयत्ता 5 ते 9 पर्यंत असलेल्या सर्व शाळा, सर्व महाविद्यालये, सर्व प्रकारची खाजगी शैक्षणिक प्रशिक्षण केन्द्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस दिनांक 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत.

9) या कालावधीत ऑनलाईन/ दरस्थ शिक्षण यांना परवानगी राहील व त्याला अधिक वाव देण्यातयावा.

10) खाजगी आस्थापना दुकाने या ठिकाणी मास्क घालून /फेस कव्हर असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा. तसेच हॉटेलच्या आतमध्ये सुध्दा मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. या बाबत दर्शनि भागात बॅनर फलक लावणे बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आढळून आल्यास स्थानिक प्रशासनाने दंडात्मक कार्यवाही करावी.

11) हॉटेलमध्ये तसेच बाहेरील आवारात पार्किंगसाठी गर्दी होणार नाही या बाबत योग्य व्यवस्थापन – सुनिश्चित करण्यात यावे. रांगा व्यवस्थापित करण्यासाठी व सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी विशिष्ट खुणा करण्यात याव्यात. तसेच दर्शनि भागात फलक लावण्यात यावा.

12) अतिथी/ ग्राहकांनी वापरलेले फेस कव्हर्स / मास्क/ हातमोजे यांची संबंधीतांनी योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात यावी.

13) जिल्हयातील सर्व आठवडी बाजार दुपारी 4.00 नंतर बंद राहतील. 14) यापूर्वी कोविड-19 चा प्रादुर्भाव फैलाव होवू नये या करिता वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेशांचे उल्लंघन होणार नाही या बाबत आवश्यक दक्षता घेण्यात यावी.

उपरोक्त प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या बाबी नगर पालिका क्षेत्रात संबधीत मुख्याधिकारी व इतर क्षेत्रामध्ये संबंधीत उपविभागीय दंडाधिकारी/तालुका दंडाधिकारी यांनी तपासणी करावी. त्याच प्रमाणे संबंधीत क्षेत्रातील पोलीस विभागाने वेळोवेळी आवश्यक तपासणी करुन नियमानुसार कार्यवाही करावी. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावली (डजझड) नुसार या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश लागू राहतील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड सहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. उक्त आदेश हे दिनांक 14/02/2021 मध्यरात्रीपासून संपूर्ण बुलडाणा जिल्ह्याकरिता लागु राहतील.

विना मास्क नागरिकांना 500 रूपये दंड

मागील 4-5 दिवसापासुन जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण अचानक वाढले आहे. त्यामुळे कोरोनाला आळा घालणे गरजेचे झाले असून यासाठी विना मास्क फिरणार्‍या तसेच सोशल डिस्टंसींगचे पालन न करणार्‍यांविरूद्ध दंडात्मक कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काल 6 फेब्रुवारी रोजी दिले. त्या अनुषंगाने आज 17 फेब्रुवारी रोजी न.प.च्या वतीने कारवाई सुरू करण्यात आली असून, शहरात विना मास्क फिरणार्‍या नागरिकांना 500 रूपये दंड आकारण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.