नगराध्यक्षच्या मध्यस्थी ने पारोळा येथे दररोज दुकाने उघडण्यास मुभा

0

पारोळा । प्रतिनिधी 

कोरोना कोव्हीड १९च्या पार्श्वभूमीवर गेल्या ४५दिवसा पासून जवळ पास संपूर्ण राज्याचे व्यवहार ठप्प झाले आहेत, त्याचप्रमाणे पारोळा येथेही मागील ४५दिवसापासुन संपूर्ण व्यवहार बंद आहेत, पंरतु काही दिवसांपूर्वी अनेक ठिकाणी काही प्रमाणात लाॅकडाऊन मध्ये सुट देण्यात येत आहे त्या प्रमाणे पारोळा शहरातही पारोळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ विजयकुमार  मुंडे यांनी आठवड्यातून दोन दिवस सुट दिली आहे परंतु याच्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनसह व्यापार्यांन मध्ये नाराजीचा सुर दिसत होता, कारण संपूर्ण पारोळा शहर हे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर आधारित आहे येथे दुसरे कोणतेही उद्योग धंदे नाहीत त्यामुळे येथील बाजारपेठ ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांन वरच आधारित आहे, त्यातच आठवड्यातून दोन दोन दिवस शहरात काही वस्तू खरेदीसाठी गावकऱ्यांना परवडणारे नाही, त्यातच आता शेती कामांना देखील सुरूवात झाली आहे, व तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी कोणतेही पब्लिक वाहतूक चालू नाही तसेच पेट्रोल पंपांनवर देखील पेट्रोल मिळत नाही, म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी ही सर्व बाब शहरातील दुकानदारांनाच्या लक्षात आणून दिली, म्हणून काही व्यापारी मंडळींनी पारोळा शहरातील कर्तव्य दक्ष नगराध्यक्ष करण पवार यांना भेटुन काही तरी मार्ग काढण्यास सांगितले या सर्वांची दखल घेत करण पवार यांनी पारोळा तहसीलदार अनिल गवांदे यांना भेटुन आठवड्यातून सहा दिवस सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व दुकाने चालू करण्याची विनंती केली, तर आठवड्यातून एक दिवस रविवारी संपूर्ण दिवस दुकाने बंद राहातील याची ही खात्री देण्यात आली, तसेच शासनाच्या आदेशानुसार सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचेही यावेळी सर्व उपस्थित व्यापारी व भाजीपाला विक्री करणारे याना निर्देश देण्यात आले, यावेळी पारोळा नगरपालिकेचे नगरसेवक दिपक अनुष्ठान,पी जी पाटील,प्रकाश वाणी,भैय्या चौधरी,संजय पाटील,कैलास चौधरी,बापु महाजन,कैलास पाटील तसेच व्यापारी केशव क्षत्रिय,विलास वाणी,संजय कासार,अशोक लालवाणी,मनोज जगदाळे,अशोक वाणी,सुनिल भालेराव, धर्मेंद्र हिंदुजा,राजेंद्र जैन, किरण गोहील, योगेश हिंदुजा, यांचे सह कापड, बुट चप्पल, सोने चांदी ,कोल्ड्रिंक्स, भाजीपाला तसेच इतर वस्तू चे व्यापारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.