नगरदेवळ्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल

0

पाचोरा(प्रतिनिधी) : नगरदेवळा ता. पाचोरा येथे वाहनांवर कारवाई करत असलेल्या पोलिसांशी हुज्जत घालून गचंडी पकडली. व ढकलुन दिल्याने येथील दहा जणांवर शासकीय कामात अडथळा केल्याचा व दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसांनी मध्यरात्री १ वाजता झोपेतुन उठवुन तिघांना ताब्यात घेतले तर सात संशयित आरोपी फरार झाले आहेत.

घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. १५ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या दरम्यान नंदकुमार ओंकार जगताप, बापु महाजन सह तिन ते चार पोलिस कर्मचारी वाहन कायद्याअंतर्गत निपाने रोडवरील साईनगर येथे कार्यवाही करत होते. यावेळी नगरदेवळा येथील कन्हैया बजरंगसिंग परदेशी (वय – ४५) हे स्वत:च्या मोटरसायकल वर जात असतांना त्यांना हात दाखवुन सेवेत असलेल्या ट्राॅफीक पोलिसांनी थांबविल्याचा राग येऊन कन्हैया बजरंगसिंग परदेशी (वय – ४५), विनोद गोपालसिंग परदेशी (वय – ४४), एकलव्य संघटनेचे तालुका उपाध्यक्ष गणेश भिल (वय – २७), यांनी पोलिसांशी हुज्जत घालून कन्हैया परदेशी याने पोलिसांना पाचशे रुपयांची लाच देण्याचे सांगुन पैसे घेतले नाहीतर मी तुमच्या वर मोटरसायकल चोरुन नेल्याचा आरोप करुन पोलिस अधिक्षक यांचेकडे तुमची तक्रार करेल. असे संबोधून नंदकुमार जगताप यांना ढकलुन दिले. यावेळी उपस्थित एका व्यक्तीने प्रकरणाची व्हिडिओ चित्रीकरण केली आहे. घटनेप्रकरणी पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय नलावडे यांनी भेट दिली. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.काॅ. रामदास चौधरी हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.