बोदवड तालुक्याचा येत्या पाच वर्षात झपाट्याने विकास करुन दाखवणार : आ.चंद्रकांत पाटलांचे

0

बोदवड : मतदार संघाच्या विकासासाठी मी तुम्हाला ३० वर्षाचा अवधी नाही तर फक्त ५ वर्षाचा वेळ मागतोय. बोदवड तालुक्याचा येत्या पाच वर्षात झपाट्याने विकास करुन दाखवणार, असा विश्वास मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

आ. चंद्रकांत पाटलांचा आज घाणखेड गावातर्फे जाहीर नागरी सत्काराचा कार्यक्रम मोठ्या ऊत्साहात पार पडला. यावेळी गावक-यांनी जल्लोषात आमदारांचे स्वागत केले. महिलांनी संपुर्ण गावांत रांगरांगोळी काढुन आमदारांचे औक्षण करत स्वागत केले. निवडणुकीच्या अगोदर घाणखेड गावातील राम मंदिरात छोटेखानि कार्यक्रम पार पाडत निवडणुकीच्या रणसंग्रामाचे नारळ फोडले होते.

याप्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात याचं मंदिरात प्रभु श्रीरामचंद्रांची आरती करत करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विरेंद्रसिंग पाटिल तसेच सुत्रसंचलन जितेंद्र पाटिल सर यांनी केले. याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांचा सत्कार विरेंद्रसिंग पाटिल यांनी केला. ठिक दुपारी ३ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यांच्या या वक्तव्याचे टाळ्यांच्या कडकडाटासहीत नागरिकांनी स्वागत केले.

प्रत्येक गावातील रस्ते,गटार,पाणी सोयसुविधा, पथदिवे,याबाबतच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी मुख्यमंत्री ऊद्धवजी ठाकरे यांच्याकडे प्रयत्न करुन गावागावांत विकास निधी पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार चंद्रकांत पाटिल यांनी सांगितले. गावागावांतील मराठी शाळा कशी जिवंत ठेवता येईल त्यातील पटसंख्या कशी वाढवता येईल , गुणवत्तापुर्ण शिक्षण कसे देता येईल ;प्रत्येक वर्गात शिक्षक कश्या प्रकारे उपलब्ध करुन देता येईल याबाबत विशेष लक्ष देऊन समस्या तात्काळ सोडविणार असल्याची स्पष्टोकती यावेळी आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांनी दिली.समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन विकास करणार असल्याचे आमदार महोदयांनी यावेळेस भाषणातुन स्पष्ट केले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे आमदार चंद्रकांत पाटिल, विरेंद्रसिंग पाटील,दिलीप पाटील , अफ्सर खान,मनोहर खैरनार , छोटू भोई,सागर पाटील, देवा खेवलकर,गजानन खोडके, ईश्वर जंगले यांच्यासहित आदि पाहुणे ऊपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निना पाटिल, गजानन भोंडेकर,गजानन पाटिल, प्रकाश घुले,संजय पाटिल,गजानन का पाटिल,संजय पाटिल,गोविंदा वडोदे,ज्ञानेश्वर वडोदे,राजू वडोदे, रतनसिंग पारधी,श्रीकांत वाघोडे , अतुल पाटील,सुनील जोशी , प्रशांत भोंडेकर,अमोल पाटील , यांच्यासहित आदि कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मेहनत घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.