भरधाव डंपरच्या धडकेत 65 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

0

कुऱ्हा पानाचे येथील घटना

भुसावळ: तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथे भरधाव डंपरच्या धडकेत 65 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. प्रल्हाद तुळशिराम पाटील (65, कुर्‍हेपानाचे) असे या मृत वृद्धांचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी डंपरसह चालकास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे कि, प्रल्हाद पाटील व त्यांचा मुलगा किशोर पाटील हे दोघे आज सकाळी त्यांच्या शेतात पायी जात होते. गावाजवळील कुर्‍हे-बोदवड रस्त्यावरील मारोती मंदिरापुढे कुर्‍हे गावाकडे येणारा भरधाव डंपर (एम.एच.19 झेड.4427) ने प्रल्हाद पाटील जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर घटनासथळावरून डंपर चालक वाहन सोडून पसार झाला. अपघात प्रकरणी किरण प्रल्हाद पाटील (कुर्‍हेपानाचे) यांच्या फिर्यादीनुसार आरोपी डंपर चालक मयूर गंगाधर फालक (साकेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीसह डंपर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तपास हवालदार युनूस शेख करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.